Indapur News : विहिरीचे काम सुरू असताना मोठी दुर्घटना! मातीच्या ढिगाऱ्याखाली ४ कामगार अडकले; बचावकार्य सुरू

Indapur : इंदापूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंदापूर तालुक्यातील म्हसोबाची वाडी येथे ८० फुट खोल असलेल्या विहिरीचे रिंग करण्याचे काम सुरु असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळल्याने चार कामगार अडकल्याची घटना घडली आहे. या कामगारांना वाचवण्यासाठी सध्या बचावकार्य सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, म्हसोबाची वाडी येथे ८० फुट खोल असलेल्या विहिरीचे रिंग करण्याचे काम सुरु होते. यावेळी अचानक मातीचा ढिगारा कोसळल्याने चार कामगार अडकल्याची घटना घडली. बचावासाठी रात्रभर पाच पाेकलेन मशिनच्या साहाय्याने माती व मुरुमाचा ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे.

Pune : हडपसरच्या विकासात भाजीपाला सोसायटीचे योगदान मोलाचे ; खासदार शरद पवार

घटनास्थळी एनडीआरएफचे जवान (NDRF Team) दाखल झाले असून बचावकार्य सुरूआहे. इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील,भिगवण पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार घटनास्थळी मदत करण्याचे काम करीत होते.

तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकाळ यांच्यासह रात्रभर अनेक युवक मदत करीत हाेते. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे सकाळी लवकर घटनास्थळी दाखल झाले असून एनडीआरएफ जवानाच्या मदतीने बचाव कार्य सुरु आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply