Indapur Accident : कारचा टायरच काळ बनला! 5 जणांचा जागीच मृत्यू, पुणे सोलापूर महामार्गावर थरारक अपघात

Indapur Accident : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण कार अपघात झाल्याची घटना घडली आहे. येथे कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात पाच जण जागीच ठार झालेत. तर एक जण गंभीर जखमी, तर एक किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर 2 येथे राष्ट्रीय महामार्गावरती हा अपघात झालाय. या अपघातात गाडीचा पुढच्या बाजूचा पूर्णतः चुराडा झाला आहे. रफिक कुरेशी, (वय - ३४), इरफान पटेल (वय -२४), मेहबूब कुरेशी (वय - २४) आणि फिरोज कुरेशी (वय - २८), अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. तर सय्यद इस्माईल कुरेशी, असं जोखमीचं नाव आहे.

Uttar Pradesh Hathras: हाथरसमधील भोले बाबांच्या सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी; ५० ते ६० जणांचा मृत्यू, मृतांमध्ये २५ महिलांचा समावेश

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने निघालेली (टी एस ०७ जी एल २५७४) ही गाडी डाळज हद्दीत आल्यानंतर गाडीचा पुढील डाव्या बाजूचा टायर फुटला. यानंतर साधारण ५० मीटर गाडी जमिनीला घासत येऊन डाव्या साईडला चार ते पाच पलट्या खात ड्रेनेज लाईनच्या सिमेंट खांबाला जोरात धडकली आणि नाल्यात जाऊन पडलीय.

गाडीत सहा पुरुष होते त्यापैकी ५ जण जागीच ठार झाले होते, तर एकजण गंबीर जखमी झालाय. तर यात सय्यद इस्माईल, सय्यद अमीर याला किरकोळ मार लागला आहे. सर्व तेलंगणा राज्यातील नारायणखेड येथील आहेत. अपघाताची माहिती समजताच डाळज महामार्गाचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं आणि ठार झालेल्यांचे मृतदेह बाहेर काढले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply