Ind Vs SL ODI Siries: नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने, सुर्यकुमारला संधी नाही,

Ind Vs SL ODI SIries: भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिका सुरू झाली आहे. नवीन वर्षात म्हणजेच २०२३ मध्ये खेळली जाणारी ही भारताची पहिली एकदिवसीय मालिका आहे. या मालिकेतील पहिला सामना आज गुवाहाटी येथे होणार आहे.

या सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेचा कर्णधार दासुन शांकाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत प्रथम फलंदाजी करणार हे स्पष्ट आहे. नाणेफेकीनंतर दोन्ही कर्णधार - रोहित शर्मा आणि दासुन शांका यांनी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली.

श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादवने शतक झळकावले. पण, त्यानंतर वनडेच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचे स्थान मिळाले नाही. सूर्यकुमारच्या जागी बांग्लादेश विरुद्धच्या वनडे मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरला संघात स्थान दिले आहे. गोलंदाजीत संघ व्यवस्थापनाने कुलदीपऐवजी चहलवर विश्वास व्यक्त केला आहे.

दुसरीकडे, श्रीलंकेच्या संघाबद्दल बोलायचे झाले तर, शेवटच्या टी-२० मध्ये झालेल्या संघात एकच बदल झाला आहे. महिष टीक्षानाच्या जागी दुनित वेलेझला संधी मिळाली आहे. याशिवाय दिलशान मधुशंका पदार्पण करत आहे. 

भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, उमरान मलिक आणि युझवेंद्र चहल

श्रीलंकेची प्लेइंग इलेव्हन- कुसल मेंडिस, पथम निसांका, अविष्का फर्नांडो, धनंजय डी सिल्वा, चारिथ असलंका, दासुन शांका, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेलेझ, कसून राजित, दिलशान मधुशंका



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply