IND vs PAK R Premdasa Stadium Pitch Report and Weather Updates in Marathi : भारत-पाकिस्तानमध्ये मागच्या काही वर्षात वर्ल्ड कपमध्ये अनेक सामने झाले आहेत. त्या सामन्यांपेक्षा टी20 वर्ल्ड कपमध्ये उद्या होणार्या सामन्याबद्दल थोडी जास्तच उत्सुक्ता आहे. याचं कारण आहे या मॅच आधी झालेला वाद. पाकिस्तानने आधी या सामन्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. नंतर आयसीसी सोबत झालेल्या बैठकीनंतर यू-टर्न घेत भारताविरुद्ध खेळण्यासाठी राजी झाले. मागच्या वर्षी आशिया कप 2025 च्या फायनलनंतरही वाद झाला होता. त्यावेळी टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळलं होतं. यावेळी सुद्धा वातावरण तसच गरम आहे. पण भारत-पाक सामन्याच्या या उत्सुक्तेवर, प्रतिक्षेवर आणि गरमा गरमीवर पाणी फेरलं नाही म्हणजे मिळवलं. कारण कोलंबोमध्ये 15 फेब्रुवारीला पावसाचा अंदाज आहे. तसा इशारा सुद्धा देण्यात आलाय.
रविवारी 15 फेब्रुवारीला ग्रुप ए मध्ये असलेल्या भारत-पाकिस्तानमध्ये मॅच होणार आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे हा सामना होईल. प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी फॅन्सच्या मनात प्रचंड उत्सुक्ता आहे. श्रीलंकन हवामान खात्याचा अंदाज अचूक ठरला, तर या सर्व उत्साहावर पाणी फेरलं जाऊ शकतं. शुक्रवारी श्रीलंकेच्या हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, दक्षिण-पूर्व मध्ये कमी दबावाचं क्षेत्र तयार होऊ शकतं. त्यामुळे सर्वच लोकांना सर्तक रहाण्यास सांगितलं आहे.
पावसाबद्दलचा अंदाज काय?
सरकारी स्टेटमेंटमध्ये थेट पाऊस पडेल असं म्हटलेलं नाही. पण हवामानावर नजर ठेवणार्या वेबसाइटनुसार, रविवारी संध्याकाळी 6 वाजता, 7 वाजता आणि 8 वाजता पावसाचा अंदाज आहे. असं झाल्यास हा सामना रद्द होऊ शकतो. अशा स्थितीत दोन्ही टीम्सना प्रत्येकी 1-1 पॉइंट मिळेल.
सामना रद्द झाल्यासं नुकसान कोणाचं?
मॅच रद्द झाल्यास कुठल्या टीमचा फायदा आणि नुकसान होईल?. फायद्याबद्दल बोलायचं झाल्यास दोन्ही टीम्सना समान फायदा होईल. कारण दोन्ही टीम्सचे प्रत्येकी 4-4 पॉइंट्स आहेत. मॅच रद्द झाल्यास 1-1 पॉइंट दोघांना मिळेल. म्हणजे दोन्ही टीम्सचे 5-5 पॉइंट होतील. दोन्ही टीम्स सुपर-8 मध्ये क्वालिफाय करतील. नुकसानीबद्दल बोलायचं झाल्यास अमेरिका आणि नेदरलँड्स दोन्ही टीम्सचं नुकसान होईल. USA ची सलग दुसऱ्यांदा सुपर 8 मध्ये पोहोचण्याची संधी हुकेल. नेदरलँड्स आणि USA चे 2-2 पॉइंट्स आहेत. दोघांचा आता फक्त एक सामना शिल्लक आहे. दोघांनी आपपले सामने जिंकले तर त्यांचे 4-4 पॉइंट होतील. ते पुरेसे नसतील.
USA सुपर-8 मध्ये पोहोचू शकते का?
भारत-पाकिस्तान सामन्याचा निकाल लागल्यास एक टीम सुपर-8 राऊंडमध्ये पोहोचेल. पण दुसऱ्या टीमला नेदरलँड्स आणि USA शी खेळावं लागेल. नेदरलँड्सचा मार्ग कठीण आहे. कारण त्यांचा शेवटचा सामना भारताशी आहे. तेच USA चा शेवटचा सामना नामीबिया विरुद्ध आहे. 15 फेब्रुवारीला टीम इंडियाने पाकिस्तानला हरवलं आणि नामीबियाने पाकिस्तानला नमवलं आणि USA ने नामीबियाला हरवलं, तर अमेरिकी टीम पुढच्या राऊंडमध्ये पोहोचेल.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


