IND vs NZ 3rd ODI : न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत निवडली गोलंदाजी

मुंबई, 24 जानेवारी : सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. आज 24 जानेवारी रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तिसरा आणि शेवटचा वनडे सामना इंदोर येथील होलकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी नाणेफेक पारपडली असून न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

दुपारी 1 :30 वाजता भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात बदल करण्यात आले आहेत. संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक झाल्यावर भारताच्या प्लेयिंग 11 विषयी सांगितले.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळवलेला पहिला सामना भारताने 12 धावांनी जिंकला होता. तर रायपूर येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यातही भारताने न्यूझीलंडला गुडघे टेकायला भाग पाडले आणि 8 विकेट्सने सामना जिंकला. या दोन्ही सामन्यात भारतीय फलंदाजांसह गोलंदाजांनीही उत्कृष्ट कामगिरी केली. तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात दिग्गज गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना प्लेयिंग 11 मधून विश्रांती देण्यात आली आहे. त्या ऐवजी यावेळी संघात उमरान मलिक आणि युझवेंद्र चहल यांना संधी देण्यात आली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply