IND vs NZ 3rd ODI : रोहितने 9 चेंडूत ठोकल्या 50 धावा! गिल पाठोपाठ कर्णधारने ठोकले शानदार अर्धशतक

India Vs New Zealand 3rd ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन वनडे मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने पहिले दोन सामने जिंकून मालिका आधीच खिशात टाकली आहे. मात्र असे असले तरी भारतीय संघाला न्यूझीलंडला व्हाईट वॉश देणे फायद्याचे ठरणार आहे. जर भारताने आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या न्यूझीलंडला 3 - 0 अशी मात दिली तर भारताला आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर जाण्याची संधी आहे. सध्या भारत दुसऱ्या स्थानावर आहे.

रोहित शर्माने 41 चेंडूत सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले. त्याने एका षटकारासह 50 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्माने आतापर्यंत आपल्या खेळीमध्ये 7 चौकार आणि 5 षटकार मारले आहे. त्याने 12 चेंडूत 58 धावा केल्या आहेत. भारताची धावसंख्या 110 च्या पुढे गेली आहे.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *