Suryakumar Yadav India vs EnglandImage Credit source: Bcci and England Cricket X Account
टीम इंडियाने मायदेशात सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजवर मात करत आयसीसी टी 20i वर्ल्ड कप जिंकण्याच्या दिशेने 1 पाऊल पुढे टाकलं आहे. टीम इंडियाने रविवारी 1 मार्च रोजी वेस्ट इंडिजवर स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात जबरदस्त असा विजय मिळवला. भारताने 196 धावांचं आव्हान हे 19.2 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. संजू सॅमसन या भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. संजूने नॉट आऊट 97 रन्स करुन भारताला विजयी केलं. संजूला या विजयासाठी सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तसेच या सामन्यानंतर सेमी फायनलचं चित्र स्पष्ट झालं.
टीम इंडिया सेमी फायनलमध्ये
टीम इंडियाने विंडीजला पराभूत करत सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज या सामन्यातून स्पर्धेतील उपांत्य फेरीत पोहचणारी चौथी टीम ठरणार होती. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरो असा होता. विंडीजने भारतासमोर 196 धावांचं अवघड आव्हान ठेवलं होतं. त्यामुळे टीम इंडिया या सामन्यात धावांचा पाठलाग करताना कशी कामगिरी करते याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष लागून होतं. मात्र संजू सॅमसन याने इतर 5 सहकाऱ्यांच्या मदतीने धमाका केला आणि भारताला उपांत्य फेरीचं तिकीट मिळवून दिलं.
टीम इंडियाआधी न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडने सेमी फायनलचं तिकीट मिळवलं. उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड भिडणार आहेत. तर टीम इंडियाचं सेमी फायनलमध्ये पोहचताच त्यांचा इंग्लंड विरुद्ध सामना होणार यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाला. त्यानंतर इंग्लंड क्रिकेटकडून एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे एक पोस्ट करण्यात आली आहे.
इंग्लंडने पोस्टमध्ये काय म्हटलंय?
इंग्लंडने 1 फेब्रुवारीला रात्री 10 वाजून 59 मिनिटांनी ही पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक याचा फोटो शेअर करण्यात आला आहे. confirmed असं या फोटोवर पाहायला मिळत आहे. आपण उपांत्य फेरीत टीम इंडिया विरुद्ध खेळणार आहोत, असं या पोस्टमध्ये म्हटलंय आहे.
इंग्लंडची एक्स पोस्ट
World Cup semi-final 🏆
Against India in Mumbai 🏏
At the Wankhede 🏟
A MASSIVE match awaits… pic.twitter.com/VGFTHMInoH
— England Cricket (@englandcricket) March 1, 2026
इंग्लंडकडून या पोस्टमध्ये उपांत्य फेरीत टीम इंडिया विरुद्ध मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


