Income Tax Raid In Nashik : नाशकात 14 ठिकाणी आयकर विभागाची धाड, राजकीय नेते अडचणीत येणार?

Income Tax Raid In Nashik : नाशिक जिल्ह्यात आज (बुधवार) सकाळी आयकर विभागाने  एकाच वेळी 14 ठिकाणी धाडी (सर्च ऑपरेशन) टाकल्या. ही कारवाई नागपूर आयकर विभागातील 42 अधिकारी आणि 34 कर्मचारी यांच्या माध्यमातून केली जात आहे.

प्राथमिक माहितीनूसार नाशिक शहरातील बी. टी. कडलग, हर्ष कन्स्ट्रक्शन, पवार-पाटकर बिल्डर्स, सांगळे कन्स्ट्रक्शन, सोनवणे बिल्डर्स या ठिकाणी आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी संबंधित कार्यालयांमध्ये चाैकशी करीत आहेत.

Follow us -

Kolhapur News : कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात, कलम 144 लागू

अवघ्या दीड महिन्यापूर्वीच यातील तिघांवर जिएसटी विभागाने कारवाई केली हाेती. अनेक राजकीय नेते, विद्यमान आमदार आणि खासदार यांचे या बड्या रियल इस्टेट कंपन्यांशी आणि ठेकेदारांसोबत व्यावसायिक संबंध असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तसेच या विविध कंपन्या या सरकारी ठेकेदार असल्याची चर्चा सुरु आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply