Imtiyaz Jaleel : वंदे भारतच्या स्वागतासाठी आलेल्या जलील यांच्यासमोर जय श्रीरामच्या घोषणा! संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर तणाव

Imtiyaz Jaleel : जालना-मुंबई वंदे भारत ट्रेनचं आज PM मोदींच्या हस्ते ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आलं. ही ट्रेन संभाजीनगर रेल्वे स्थानकात आल्यानंतर तिथं खासदार इम्तियाज जलील यांनी हजेरी लावली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा द्यायला सुरुवात केली.

यामुळं एमआयएमचे कार्यकर्ते अनं भाजपचे कार्यकर्ते यांच्यात घोषणाबाजीमुळं काही काळ तणाव पहायला मिळाल. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

Rashmi Shukla : रश्मी शुक्ला राज्याच्या पोलीस महासंचालक होणार? केंद्रीय लोकसेवा आयोगाचा ग्रीन सिग्नल

जलील यांना निमंत्रणच नाही

जालना-मुंबई वंदे भारत ट्रेन ही खास मराठवाड्यासाठी सुरु करण्यात आली आहे. पण मराठवाड्यातील संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांचं नाव निमंत्रण पत्रिकेत नव्हतं. जलील यांन निमंत्रण नसल्यानं कालपासून एमआयएमचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले होते. 

दोन्ही कार्यकर्ते समोरा-समोर

दरम्यान, आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमानास जालन्याहून छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर वंदे भारत ट्रेन येत असल्यामुळं जलील यांच्यासह एमआयएमचे कार्यकर्ते रेल्वे स्थानकात आले होते. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी या सगळ्यांना अडवलं आणि त्याच्यासमोर जोरदार घोषणाबाजी सुरू केली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोदी मोदीच्या घोषणा देत जय श्रीरामच्या घोषणाही दिल्या. 

तर दुसरीकडं जलील आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी थांबवत जलील यांना एका रूममध्ये घेऊन गेले त्यानंतर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनीही जोरदार घोषणाबाजी केली. रेल्वे स्टेशनवर वंदे भारत ट्रेन येण्यापूर्वी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून स्थानिक पोलीस MIMच्या कार्यकर्त्यांना घेऊन रेल्वे स्थानकाबाहेर आले होते.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply