ICC World Cup 2023 : आयसीसी वनडे वर्ल्डकपला आजपासून सुरुवात; पहिला सामना इंग्लंड-न्यूझीलंड मध्ये अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे रंगणार

ICC World Cup 2023 : बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा वनडे वर्ल्डकपला आजपासून (५ ऑक्टोबर) सुरुवात होणार आहे. भारतात होणाऱ्या या विश्वचषकात एकूण १० संघ सहभागी होणार असून पुढील ४५ दिवस क्रिडाप्रेमींना सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, स्पर्धेतील पहिला सामना गेल्या हंगामातील वर्ल्डकप विजेते इंग्लंड आणि उपविजेते न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम (मोटेरा स्टेडियम) दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आला आहे. 

त्यामुळे पहिला सामना जिंकून कोणता संघ वर्ल्डकपचा (ICC World Cup 2023) श्रीगणेशा करणार याकडेच क्रिडाप्रेमींचं लक्ष लागून असेल. आयसीसी वनडे वर्ल्ड कपमधील सर्व सामने हे एकूण भारतातील १० शहरांमधील स्टेडियममध्ये पार पडणार आहेत.

दरम्यान, यंदाच्या वर्ल्डकपचे सामने प्रेक्षकांना मोबाईलवर फुकटात पाहता येणार आहे. स्टार स्पोर्ट्स या क्रिडावाहिनीवर प्रेक्षकांना वर्ल्डकपचे सामने पाहता येतील. याशिवाय मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार अँपद्वारे देखील सामन्यांचा थरार पाहता येणार आहे. विशेष बाब म्हणजे यासाठी क्रिडाप्रेमींना एकही रुपया खर्च करावा लागणार नाही.

हे सर्व सामने फुकटात पाहता येणार आहे. याआधी हॉटस्टारवर मॅच पाहण्यासाठी क्रिडाप्रेमींना खिसा रिकामा करायला लागयचा. मात्र, आता वाढत्या स्पर्धेमुळे हॉटस्टारने सामने फुकटात दाखवण्याचा निर्णय घेत क्रिकेट चाहत्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply