ICC T20 Team Ranking : टी-20 वर्ल्ड कपआधीICCची मोठी घोषणा! क्रमवारीत भारतीय संघ पहिल्यास्थानावर कायम

ICC T20 Team Ranking : वेस्ट इंडीज व अमेरिका येथे येत्या २ जूनपासून टी-२० विश्वकरंडकाची धूम रंगणारआहे. त्याआधी भारतीय क्रिकेट संघाचा आत्मविश्वास उंचावणारी घटना घडली आहे. आयसीसीकडून बुधवारी टी-२० प्रकारातील सध्याची कमवारी जाहीर करण्यात आली. भारतीय संघाने यामध्ये पहिले स्थान कायम राखले आहे. दोन वेळा ही स्पर्धा जिंकलेल्या वेस्ट इंडीज संघाने चौथ्या स्थानावर मुसंडी मारली आहे.

भारतीय संघ पहिल्या स्थानावर असून बलाढ्य ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. गतविजेता इंग्लंडचा संघ तिसऱ्या स्थानावर असून न्यूझीलंडचा संघ पाचव्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज अदिल रशीद याने पहिले स्थान पटकावले आहे. भारताचा अक्षर पटेल तिसऱ्या स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत श्रीलंकेचा वनिंदू हसरंगा याने पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.

T20 World Cup 2024 : विश्वचषकातील भारत- पाकिस्तान सामना संकटात? ISIS च्या धमकीमुळे अमेरिकेत खळबळ

सूर्यकुमार अग्रस्थानी

भारताचा टी-२० स्पेशालिस्ट फलंदाज सूर्यकुमार यादव फलंदाजाच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम आहे. फिल सॉल्ट याने दुसरे, तर मोहम्मद रिझवान याने तिसरे स्थान मिळवले आहे. बाबर आझम चौथ्या स्थानी असून एडन मार्करम पाचव्या स्थानी आहे.

टी-२० क्रमवारी (संघ)

१) भारत (२६४ रेटींग)

२) ऑस्ट्रेलिया (२५७ रेटींग)

३) इंग्लंड (२५४ रेटींग)

४) वेस्ट इंडीज (२५२ रेटींग)

५) न्यूझीलंड (२५० रेटींग).

टी-२० क्रमवारीतील अव्वल पाच फलंदाज

१) सूर्यकुमार यादव (८६२ रेटींग)

२) फिल सॉल्ट (७८८ रेटींग)

३) मोहम्मद रिझवान (७६९ रेटींग)

४) बाबर आझम (७६१ रेटींग)

५) एडन मार्करम (७३३ रेटींग)

टी-२० क्रमवारीतील अब्बल पाच गोलंदाज

१) अदिल रशीद (७२२ रेटींग)

२) वनिदू हसरंगा (६८७ रेटींग)

३) अक्षर पटेल (६६० रेटींग)

४) माहीश तीक्षणा (६५९ रेटींग)

५) रवी बिश्नोई (६५९ रेटींग)

टी-२० क्रमवारीतील अव्वल पाच अष्टपैलू

१) वनिंदू हसरंगा (२२८ रेटींग)

२) शाकीब उल हसन (२२३ रेटींग)

३) मोहम्मद नबी (२१८ रेटींग)

४) सिकदर रझा (२२० रेटींग)

५) मार्कस स्टॉयनिस (२०४ रेटींग)



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply