Hydrogen Train Engine : १,२०० हॉर्सपॉवर, जगातील सर्वात पावरफुल हायड्रोजन ट्रेन इंजिन भारतात; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा

Hydrogen Train Engine Quality : वंदे भारत एक्स्प्रेससारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पानंतर भारतात हायड्रोजन रेल्वे प्रकल्प सुरु होणार आहे. देशात लवकरच हायड्रोजन रेल्वे धावणार असल्याचे म्हटले जात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर भारत हा हायड्रोजन रेल्वे चालवणारा ५ वा देश बनणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हायड्रोजन रेल्वेसंबंधित अपडेट दिली. भारतात तयार होणाऱ्या हायड्रोजन ट्रेनचे वैशिष्ट्यांची माहिती त्यांनी दिली.

प्रवासी भारतीय दिवसाच्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते. ते म्हणाले, "भारतीय रेल्वेद्वारे विकसित केले जाणारे हायड्रोजन ट्रेनचे इंजिन हे जगातील सर्वाधिक हॉर्स पॉवर असणारे इंजिन आहे. जगातील फक्त चार देशांमध्ये हायड्रोजन ट्रेन इंजिनाची निर्मिती केली जाते. ते लोक ५०० ते ६०० हॉर्स पॉवर असलेले इंजिन तयार करतात. आता भारतीय रेल्वेद्वारे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करुन बनवण्यात आलेले इंजिन हे १,२०० हॉर्स पॉवर क्षमतेचे असणार आहे."

Pune Crime : हॉर्न वाजवल्याने सटकली! दोघांनी कुटुंबाला केली बेदम मारहाण, महिलांनाही सोडलं नाही

ते पुढे म्हणाले, "हरियाणामधील जींद ते सोनीपत या मार्गावर लवकरच हायड्रोजन ट्रेनचे परिक्षण केले जाणार आहे. हायड्रोजन ट्रेनचे इंजिन तयार असून सध्या तंत्रप्रणालीचे एकत्रीकरण सुरु आहे. अशा प्रकारच्या तांत्रिक प्रगतीमुळे देशवासियांना आत्मविश्वास मिळतो. भारताला तांत्रिक स्वावलंबन होण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे."

प्रत्येक ट्रेन चालण्यासाठी इंधन म्हणून डिझेल किंवा वीज लागते. हायड्रोजन ट्रेन ही पाण्याच्या शक्तीवर धावते. या ट्रेनमध्ये हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर करुन वीज निर्मिती केली जाते. यामुळे झिरो कार्बन इमिशन होते. ही ट्रेन पर्यावरन पूरक असल्याचेही सांगितले जाते. हायड्रोनचे ऑक्सिजनशी संयोग होऊन पाणी तयार होते. पुढे वाफ आणि पाणी इंधन म्हणून वापरले जाते. यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply