Hydrogen Train : मुंबई किंवा दिल्ली नाही तर या ठिकाणाहून धावणार सर्वात पहिली हायड्रोजन ट्रेन

Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रेजन ट्रेन ही तयार झाली आहे. हायड्रोजन ट्रेनमुळे प्रदुषण कमी होणार आहे. ही ट्रेन हायड्रोजनवर चालणार आहे. भारतात तयार झालेली ही हायड्रेजन ट्रेन लवकरच सुरु केली जाणार आहे.या ट्रेनमुळे नागरिकांचा प्रवास आणखी सुखी होणार आहे.

हायड्रोजन ट्रेनचे ट्रायल झाले आहे. ही ट्रेन लवकरच सामान्य नागरिकांसाठी सुरु होणार आहे. हायड्रेजन ट्रेनचे काही फोटो याआधी आरडीएसओने शेअर केले होते. ही ट्रेन आतून खूप प्रशस्त आहे. या ट्रेनमध्ये सर्व सुविधा मिळणार आहे. या ट्रेनने वेगवान प्रवास होणार आहे.या ट्रेनला आरडीएसओने डिझाइन केले आहे. ज्यात इंटिग्रल कोच फॅक्ट्री चैन्नईमध्ये बनवली आहे.

देशातील ही पहिली हायड्रोजन ट्रेन लवकरच धावणार आहे. ही ट्रेन मुंबई- पुण्यात नव्हे तर हरियाणात धावणार आहे. हरियाणातील जींद ते सोनीपत यादरम्यान ही ट्रेन धावणार आहे. देशातील हायड्रोजन ट्रेन मार्च-एप्रिल २०२५ पर्यंत सुरु होण्याची शक्यता आहे.

Dhule Fraud Case : एमएसईबी अधिकारी असल्याची बतावणी करत लाखोंचा गंडा; धुळे सायबर पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात

हायड्रोजन ट्रेन 

वंदे भारतनंतर हायड्रोन ट्रेन हा प्रकल्प भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. भारत हा हायड्रोजन ट्रेन चालवणारा भारत ५ वा देश ठरणार आहे. या हायड्रोजन ट्रेनमध्ये हॉर्स पॉवर इंजिन असणार आहे. जगातील फ्त चार देशांमध्येच या इंजिनची निर्मिती केली जाते. त्यातील एक भारत आहे. इतर देश ५०० ते ६०० पॉवर असलेलेल इंजिन तयार करतात. भारतीय रेल्वेने आता स्वतः १२०० हॉर्स पॉवर क्षमतेचे इंजिन बनवले आहे. हरियाणातील जिंद ते सोनीपत या मार्गावर हायड्रोजन ट्रेनचे प्रशिक्षण केले जाणार आहे.

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply