Hyderabad Fire : गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत अपार्टमेंट जळून खाक; चार दिवसाच्या बाळासह ९ जणांचा होरपळून मृत्यू

Hyderabad Fire : तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील नामपल्ली येथे एका गोडाऊनला लागलेल्या आगीत अपार्टमेंट जळून खाक झालं. या दुर्घटनेत चार दिवसाच्या मुलासह ९ जणांचा होरपळून मृत्यू झालाय. सेंट्रल झोनचे डीसीपी व्यंकटेश राव यांनी या दुर्घटनेविषयी माहिती दिलीय.

आग लागलेलं अपार्टमेंट हे नामपल्लीच्या बाजारपेठेत आहे. या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर आग लागली होती. त्यानंतर या आगीने वरील मजल्यांना आपल्या विळख्यात घेतलं. तळमजल्यावर गोडाऊन असल्याचं सांगितलं जात आहे. याच गोडाऊनला आग लागली होती.

NCB Raids : मुंबईसह दिल्लीत एनसीबीची मोठी कारवाई; १५ कोटींचे अंमली पदार्थ जप्त, दोघांच्या मुसक्या आवळल्या

या आगीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यात नागरिकांना घराच्या खिडक्यातून लोकांना बाहेर काढत वाचवण्यात येत आहे. नामपल्लीतील बाजारपेठेतील अपार्टमेंटला आग लागल्याची घटना सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. आग शमवण्यासाठी अग्निशमनदलाचे चार वाहन घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचाव आणि मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply