HSC Result 2025 : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने (MSBSHSE) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांची आणि पालकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. कारण बारावीचा निकाल उद्या म्हणजे ५ मे रोजी जाहीर होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाने नुकताच ही घोषणा केली. उद्या दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहयला मिळेल. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली.
माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांत परीक्षेचा बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली. ५ मे रोजी दुपारी १ वाजता बारावीचा निकाल जाहीर होईल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे बारावीचे विद्यार्थी आणि पालकांना निकालाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
|
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण १५,०५,०३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. त्यामध्ये ८,१०,३४८ मुले, ६,९४,६५२ मुली व ३७ ट्रान्सजेंडर आहेत. एकूण १०५५० कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती. तर या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्याथ्यांसाठी ३३७३ मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
बारावीची परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती. बारावीच्या परीक्षांच्या निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर निकालाची तारीख कधीही जाहीर केली जाऊ शकते असे देखील सांगितले जात होते. त्यानुसार आज बारावीच्या निकालाची तारीख राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी जाहीर केली.
निकाल कुठे पाहाल -
१. https://results.digilocker.gov.in
२. https://mahahsscboard.in
३. http://hscresult.mkcl.org
४. https://results.targetpublications.org
५. https://results.navneet.com
कसा चेक कराल निकाल?
- विद्यार्थ्यांनी सर्वात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवर जावे.
- होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025’ लिंक दिसेल. त्या लिंकवर क्लिक करावे.
- क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी सीट नंबर टाका नंतर आईचे अचूक नाव टाका. त्यानंतर ‘सबमिट’ बटनवर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा रिझर्ट स्क्रीनवर दिसेल.
- हा रिझर्ट डाऊनलोड करून ठेवा.
शहर
- Pune : पुणेकरांवर आजपासून पाणीसंकट, कोणत्या दिवशी कोणत्या भागात पाणीकपात?
- Hadapsar-Jodhpur Express : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून धावणार नवीन एक्स्प्रेस ट्रेन, पाहा संपूर्ण वेळापत्रक
- Purandar : विमानतळाला जागा देण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध, पोलिसांचा लाठीचार्ज, धक्काबुक्कीत वृद्ध महिलेचा जीव गेल्याचा आरोप
- KDMC च्या हद्दीत ८ बोगस शाळा, सर्वेक्षणांतून धक्कादायक माहिती समोर
महाराष्ट्र
- 12th HSC Result : संतोष देशमुखांची लेक झाली पास! बारावीला मिळाले इतके गुण, कुटुंबियांचे डोळे डबडबले
- HSC Result 2025 : बारावीचा निकाल जाहीर! कोकणने परंपरा राखली तर लातूर तळाशी, जाणून घ्या कुठल्या विभागाचा निकाल किती टक्के?
- Nashik Crime : नाशिक पुन्हा हादरले; मध्यरात्रीच्या सुमारास इसमाची हत्या, एकजण ताब्यात
- 12th HSC Result : अभिनंदन! बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींचीच बाजी
गुन्हा
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
- Pune : समाज माध्यमातील ओळखीतून तरुणीवर बलात्कार; हडपसर पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
- Mumbai : थंड पाणी देण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं, ५५ वर्षीय नरधमाकडून ४ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार; बोरिवलीत खळबळ
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Pahalgam : पाकिस्तानचा बुरखा फाटला, पहलगाममध्ये पुरावे सापडले, लष्कर ए तोयबा अन् ISI ने कट रचला, NIA च्या तपासात खुलासा
- Gujarat : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गुजरातमध्ये मोठी कारवाई; पोलिसांनी हजारो बेकायदेशीर परदेशी नागरिकांना घेतलं ताब्यात!
- Pahalgam Terror Attack : भारताने अचानक झेलम नदीत पाणी सोडले; पाकिस्तानात भयंकर पूर, नागरिकांची धावपळ, आणीबाणी जाहीर,
- Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर मोठी कारवाई, संशयित दहशतवादी आसिफ-आदिलचे घर उद्ध्वस्त