Hingoli News : कत्तलीसाठी बैलांना कोंबून नेणारा ट्रक पोलिसांनी केला जप्त

Hingoli News : मुक्या जनावरांची अवैधपणे होत असलेली वाहतूक अजूनही सुरूच आहे. अनेकदा असे प्रकार समोर आल्यानंतर एकाच गाडीत कोंबून वाहतूक केली जात आहे. असाच प्रकार हिंगोलीमध्ये समोर आला असून पोलिसांनी कारवाई करत ट्रक जप्त केला आहे. 

हिंगोली- वाशिम महामार्गावरील एका ट्रकमधून अवैधरित्या कत्तलीसाठी बैलाना नेले जात होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत महामार्गावर तपासणी सुरु केली. या दरम्यान महामार्गावरील चिंचाळा पाटीजवळ बैलांना घेऊन जाणारा ट्रक थांबवत पोलिसांनी तपासणी केली. यानंतर  पोलिसांनी बैलांची सुटका करत ट्रक जप्त केला आहे.  सदरील कारवाई पोलीस उपअधीक्षक सुरेश दळवे यांच्या पथकाने केली आहे.  

 

Uddhav Thackeray : तर राऊतही भाजपमध्ये गेले असते..., अकोलेच्या सभेत उद्धव ठाकरेंनी सांगितलं यामागचं खरं कारण

आरोपीस ट्रक चालक फरार 

पोलिसांनी कारवाई केली असताना घटनास्थळावरून ट्रक चालक व इतर आरोपींनी पळ काढत फरार झाले आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या ट्रकमधून एकूण ३३ बैल आणि वासरांची सुटका केली. ही जनावरे आता शासकीय गोशाळेत जमा करण्यात आली आहेत. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply