Hingoli Earthquake News : हिंगोलीकर साखर झोपेत असताना जमिनीतून गूढ आवाज आणि हादरे, नागरिकांमध्ये घबराट

Hingoli Earthquake News : मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. गुरुवारी मध्यरात्री नागरिक साखर झोपेत असताना अचानक जमिनीमध्ये गुढ आवाज होऊन हादरे बसले. घाबरलेल्या नागरिकांनी घराबाहेर पडत मोकळ्या जागी पळ काढला.

दरम्यान हिंगोली जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने देखील भूकंपाचे हे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती दिली आहे. मात्र या भूकंपाची भूमापक केंद्रावर अद्याप देखील नोंद झाली नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले आहे. 

Hingoli News : 'मराठा समाजात जन्माला आलो हा माझा गुन्हा आहे का?', २७ वर्षीय तरुणाने आरक्षणासाठी जीवन संपवलं

दरम्यान औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी, येडुत, धामणी, वसई तर वसमत तालुक्यातील, वापटी, कुपटी, पांगरा, कुरुंदा यासह २० गावांमध्ये हे धक्के जाणवले असल्याचे प्रशासन व नागरिकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

मागील तीन वर्षांपासून या भागात सतत भूकंपाचे धक्के जाणवत असून या भूकंपाची लातूर येथील भूमापक केंद्रावर अनेक वेळा नोंद झाली आहे. आज देखील या भागात भूकंपाचा सोम्य धक्का जाणवल्याने महसूल व पोलीस प्रशासनाच्या वतीने या गावांमध्ये जाऊन नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन आता करण्यात आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply