Hingoli Earthquake : हिंगोली भूकंपाने हादरला, 16 ते 18 गावांना जाणवले धक्के

हिंगोली जिल्ह्यात भुकंपाचे सौम्य धक्के बसले आहे. 16 ते 18 गावांना सौम्य धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 3.6 रिश्‍टर स्केलची नोंद झाली आहे.

पहाटे साडेचार वाजता हा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल एवढी होती, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे देण्यात आली आहे. तसेच, नॅशनल सेंटर फॉर सिसमोलॉजीतर्फेही या भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल एवढी असल्याचे सांगण्यात आले आहे.

हिंगोलीच्या वसमत, औंढा व कळमनुरी तालुक्यातील जवळपास सोळा ते अठरा गावांच्या परिसरात आज सकाळी भूकंपाचे हादरे जाणवले आहेत. वसमत तालुक्यातील कुरंदासह परिसरातील वापटी, कुपटी, पांगरा शिंदे, कळमनुरी तालुक्यातील बोल्डा परिसर औंढा तालुक्यातील पिंपळदरी जलालदाभा , दुधाळा आदी गावांच्या परिसरात सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास हे भूकंपाचे हादरे बसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

हिंगोली जिल्ह्यात विशेषतः वसमत, कळणनुरी व औंढा नागनाथ तालुक्यात मागील 8 ते 10 वर्षांपासून जमिनीतून आवाज येण्याचे प्रकार होत आहेत. भूगर्भातील सुक्ष्म हालचालींमुळे हे आवाज येत असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply