Hingoli Accident : मेंढ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू, तर 100-150 मेंढ्याही ठार

Hingoli Accident : हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघात झाला आहे. कळमनुरीजवळ असलेल्या माळेगाव फाटा येथे मेंढ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर शंभर ते दीडशे मेंढ्यांचा देखील मृत्यू झाला आहे.

सकाळच्या सुमारास चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं.

पोलिसांना स्थानिकांच्या मदतीने जखमी नागरिकांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. यावेळी पाच जणांचा डॉक्टारांनी मृत घोषित केलं. सध्या जखमी झालेल्या मेंढ्यांवर पशुवैद्यकीय रुग्णालयामार्फत उपचार करण्यात येत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *