Hingoli PDCC Bank : पीडीसीसी बँकेत मारहाण प्रकरणी शेतकऱ्यावर गुन्हा दाखल; शेतकरीही करणार तक्रार

Hingoli : पीक विम्याची रक्कम बँक खात्यात जमा झाली आहे. यामुळे बँकेत रक्कम काढण्यासाठी शेतकरी येत आहेत. अशातच हिंगोलीच्या पीडीसीसी बँकेत पिक विम्याची रक्कम काढण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी बँकेत राडा केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँक व्यवस्थापनाच्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगोलीच्या पीडीसीसी बँकेत पीक विम्याची रक्कम काढण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना बँक अधिकारी दुय्यम वागणूक देत असल्याचा आरोप करत शेतकरी संतप्त झाले होते. यावरून बँक अधिकाऱ्यांशी शाब्दिक वाद झाल्यानंतर प्रकरण हाणामारी पर्यंत गेले होते. यामुळे बँकेत प्रचंड राडा झाला शेतकऱ्यांनी राडा केला होता. या प्रकरणी बँक अधिकाऱ्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय रघुजी वाघमारे व चांदू रघुजी वाघमारे अशी दोन सख्ख्या भाऊ असलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात,२ सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू

शेतकरीही जाणार पोलिसात

दरम्यान बँकेत झालेल्या राड्याप्रकरणी शेतकऱ्यांवर बँक अधिकाऱ्याने गुन्हा दाखल केला आहे. तर आता बँकेच्या व्यवस्थापकांनी शाखेच्या बाहेर येऊन कर्मचाऱ्यांना सोबत घेत शेतकऱ्यांना देखील बेदम मारहाण केल्याने आता शेतकरी देखील बँक व्यवस्थापनाच्या विरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल करणार आहेत. यामुळे सदरचे प्रकरण तापणार असल्याचे चित्र आहे.

पिक विमा रक्कम काढण्यासाठी बँकांमध्ये गर्दी हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विम्याचे पैसे जमा झाले आहेत. हे पैसे काढण्यासाठी शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये गर्दी करत आहेत. दरम्यान मध्यवर्ती बँकेत अपुरे मनुष्यबळ असल्याने शेतकऱ्यांना रांगेत ताटकळत उभं राहावं लागतं आहे. त्यात बँकेचे शिपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरील पीक विम्याची रक्कम काढून देण्यासाठी शंभर ते दोनशे रुपये अतिरिक्त घेत रांगेत नसलेल्या शेतकऱ्यांना बँकेत प्रवेश देत असल्याने बँकांमध्ये वाद सुरू आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply