Vasamat Accident : चालकाने ब्रेक ऐवजी क्लच दाबला; दहा फूट लांब ओढत दोघांना चिरडले, वसमतमधील थरारक घटना

Hingoli : हिंगोलीच्या वसमतमध्ये कार चालकाने दोघांना चिरडल्याची थरारक घटना घडली आहे. कार चालकाने ब्रेक ऐवजी क्लच दाबल्याने हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. यात दोघांना धडक देऊन उडवत दहा फूट अंतरापर्यंत ओढत नेले. इतकेच नाही तर कार चालकाने गाडी न थांबविता. सुसाट कार नेत एकाच्या डोक्यावरून कार नेली. या घटनेत एकजण गंभीर, तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे.

हिंगोलीच्या वसमत शहरातील झेंडा चौक परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेत कार चालकाने फुटपाथवर उभ्या असलेल्या दोघांना दहा फूट लांब चिरडत घेऊन गेल्याची घटना घडली आहे. झेंडा चौक परिसरात झालेल्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पुढे आल्याने हा अपघात किती भीषण होता हे सीसीटीव्हीच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. प्रत्यक्षदर्शिनी देखील या थरारक अपघाताची माहिती दिली आहे.

दहा फुटापर्यंत ओढत नेले

दुकानाच्या पुढे उभे असताना काही क्षणात अपघातग्रस्त कार दोघांना चिरडत पुढे घेऊन गेली. धक्कादायक म्हणजे कार चालकाने अपघाताच्या घटनेनंतर कार जागेवर न थांबवता जखमींच्या डोक्यावरून नेल्याचे देखील अपघाताच्या घटनेवेळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. दरम्यान पोलिसांनी आता कार चालक प्रदीप टाक याला ताब्यात घेतले आहे.

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply