Hindu Jan Aakrosh Morcha: मुंबईच्या शिवाजी पार्कात ‘जन आक्रोश’; भाजप नेत्यांचं शक्तीप्रदर्शन

मुंबई : लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून शिवाजी पार्क येथे हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे.

हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली असून प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, आशिष शेलार, केशव उपाध्ये आणि चित्रा वाघ या मोर्चात सहभागी झाले आहेत. आगामी काळात होवू घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुका पार्श्वभूमीवर या मोर्चाला महत्त्वा प्राप्त झालं आहे. मुंबईतील आघाडीचे नेते या मोर्चाला आवर्जुन उपस्थित आहेत.देशात तसेच राज्यात वाढलेल्या लव्ह जिहादच्या घटना, मुंबईत फोफावलेले लँड माफिया तसेच मशिदीवरील भोंग्या विरोधात सकल हिंदू समाजातर्फे महामोर्चा काढण्यात आला आहे.

मोर्चा कामगार मैदान मार्गे प्रभादेवी येथे पोहचणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. गैर प्रकार टाळण्यासाठी शीघ्र कृती दलाचे पथक देखील तैनात ठेवण्यात आले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *