Heart Attack: घरी एकटं असताना हार्ट अटॅक आला तर…! १५ सेकंदांत करा हे तातडीचे उपाय

घरी एकट्याला हार्ट अटॅक येणं हे अत्यंत धोकादायक मानलं जातं. अशावेळी आपल्या मदतीला कोणी नाही यामुळे त्या व्यक्तीला अजूनच भीती वाटू लागते. मात्र डॉक्टर सांगतात की, हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं वेळेत ओळखून काही सेकंदांत योग्य पावलं उचलली, तर जीव वाचू शकतो. म्हणूनच अशा वेळी काय केलं पाहिजे हे माहिती असायला हवं. दीर्घ श्वास घ्यातज्ज्ञांच्या मते, शक्य तितक्या दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे फुफ्फुसांमध्ये अधिक प्रमाणात ऑक्सिजन पोहोचतो. अशा प्रसंगी तो शरीराला गरजेचा असतो. जॉन हॉपकिन्स यांच्या माहितीनुसार, अॅम्ब्युलन्स येईपर्यंत दीर्घ श्वास घेणं उपयोगी ठरतं. यामुळे मन शांत राहतं आणि शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा कायम राहतो. जोरात खोकण्याचा प्रयत्न कराडॉक्टर सांगतात की, दर दोन सेकंदांनी जोरात खोका. छातीत साचलेला कफ बाहेर काढण्यासाठी आपण कसे खोकतो, त्याप्रमाणे खोका. खोकल्यामुळे छातीच्या आतील भागात दाब निर्माण होतो आणि काही प्रमाणात रक्त आणि ऑक्सिजनचा प्रवाह टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.Chest Pain Symptoms: छातीत सतत चमक-जळजळ होण्याचे कारण काय? असू शकतो 'या' आजाराचा धोका, तज्ज्ञांनी दिली माहिती शिकागो मेडिसिनच्या माहितीनुसार, खोकताना छातीतील दाबात (intrathoracic pressure) बदल होतो. हा बदल हृदयाकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहावर परिणाम करतो आणि मेंदूशी जोडलेल्या नर्व्ह सिस्टीमवर परिणाम करतो. या प्रक्रियेमुळे काही वेळा रक्तप्रवाह आणि electrical system मध्ये छोटे बदल होऊन अनियमित ठोके थांबण्यास मदत होऊ शकते.आपत्कालीन सेवांना फोन कराजर तुम्ही हार्ट पेशंट असाल तर आपत्कालीन सेवांचा नंबर जवळ ठेवा आणि लगेच कॉल करा. मात्र अशावेळी स्वतः वाहन चालवत रुग्णालयात जाण्याचा प्रयत्न करू नका. फोन स्पीकरवर ठेवा जेणेकरून तुम्हाला समोरून दिल्या जाणाऱ्या सूचना ऐकून त्याप्रमाणे कृती करता येईल.Liver Damage Tea: गरमागरम चहाने दिवसाची सुरुवात करताय? लिव्हरवर होईल गंभीर परिणाम, संशोधनातून माहिती समोरअ‍ॅस्पिरिन चावून घ्याडॉक्टरांचा सल्ला असा आहे की, जर तुम्हाला अ‍ॅस्पिरिनची अ‍ॅलर्जी नसेल तर साधारण ३२५ मिग्रॅची एक अ‍ॅस्पिरिन गोळी चावा. ती पूर्ण गिळू नका. अ‍ॅस्पिरिनमुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. गोळी चावल्यामुळे ती लवकर रक्तप्रवाहात मिसळते आणि गुठळ्या वाढण्यापासून रोखण्यास मदत होते. मात्र जर तुम्हाला अ‍ॅस्पिरिनची अ‍ॅलर्जी असेल किंवा डॉक्टरांनी आधीच अ‍ॅस्पिरिन घेऊ नका असं सांगितलं असेल, तर हा उपाय करू नका.Weight Loss Diet Plan: वजन कमी करण्यासाठी 1200 कॅलरी डाएट प्लान करा फॉलो, आठवड्याभरात दिसेल फरककोणाला हार्ट अटॅकचा येण्याचा धोका जास्त असतो?उच्च रक्तदाबमधुमेहउच्च कोलेस्टेरॉलधूम्रपानाची सवयलठ्ठपणाकुटुंबात हृदयविकाराचा इतिहासदीर्घकाळ ताणतणावया घटकांवर नियंत्रण ठेवल्यास हार्ट अटॅकचा धोका कमी करता येतो. त्यामुळे आपत्कालीन पावलं माहिती असणं जितकं गरजेचं आहे. AI diet plan: वजन घटवण्यासाठी AI कडून डाएट प्लान घेणं योग्य? हा पर्याय आरोग्यासाठी फायदेशीर आहे जाणून घ्या


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *