Hasan Mushrif ED Raid : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या घरावर ईडीची छापेमारी; राजकीय वर्तुळात खळबळ

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. सकाळी ६ वाजता मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कागल येथील घरावर ईडीने छापेमारी केली असल्याची माहिती आहे. अचानक छापेमारी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

माहितीनुसार, ज्यावेळी ईडीने ही छापेमारी केली तेव्हा हसन मुश्रीफ हे घरी नव्हते. मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर ईडीने आयकर विभागासह छापेमारी केल्याचं समजताच परिसरात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून ईडी आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली आहे. दुसरीकडे ईडीने मात्र, परिसर सील केला असून आपली छापेमारी सुरू ठेवली आहे.

प्राप्त माहितीनुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत प्राप्तीकर विभागाचे अधिकारीही असल्याचे समजते. सध्या या अधिकाऱ्यांकडून हसन मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील १०० कोटीच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. याचप्रकरणात ही कारवाई झाल्याचे समजते आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply