Haryana Clash News: हरियाणात शोभायात्रेत हिंसाचार, 40 वाहने जळून खाक; सरकारने इंटरनेट सेवा केली बंद

Haryana Clash News : हरियाणातील नूह येथे विश्व हिंदू परिषद आणि मातृशक्ती दुर्गा वाहिनीच्या वतीने काढण्यात आलेल्या ब्रजमंडल यात्रेवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. यानंतर येथे मोठा हिंसाचार झाला आहे. ज्यामध्ये 40 वाहने हिंसक जमावाने जाळली, असं सांगण्यात येत आहे.

या हिंसाचारात पोलिसांसह अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. वाद वाढत गेल्याने अनेक गोळ्याही झाडण्यात आल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने इंटरनेट सेवा बंद केली आहे. त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. नूह व्यतिरिक्त आजूबाजूच्या जिल्ह्यांतून पोलिस बंदोबस्त मागवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Tourists Beaten In Nashik : धबधब्यावर मजा करायल गेले अन् सुजून आले, हुल्लडबाज पर्यटकांना सुरक्षारक्षकांची बेदम मारहाण



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply