Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंम

Hardik Pandya Banned : आयपीएल 2024 चा हा हंगाम मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यासाठी खूपच खराब गेला. शुक्रवारी (17 मे), वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. आणि त्यानंतर बीसीसीआयने हार्दिक पांड्यावर मोठी कारवाई केली.

खरं तर, लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळला आणि त्यामुळे त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. याचा अर्थ जेव्हा आयपीएल 2025 सुरू होईल तेव्हा हार्दिक पांड्या पहिला सामना खेळू शकणार नाही.

हार्दिक पांड्या याआधी दोनदा स्लो ओव्हर रेटसाठी दोषी ठरला होता. त्यावेळी त्याला दंड ठोठावला आणि सोडून देण्यात आले. मात्र, आयपीएलमध्ये असा नियम आहे की जर कोणताही कर्णधार स्लो ओव्हर रेटसाठी तीनदा दोषी आढळला, तर त्याच्यावर एका सामन्याची बंदी घातली जाते आणि हार्दिक पांड्याबाबतही असेच झाले.

IPL 2024 : लाजिरवाण्या पराभवासह मुंबई इंडियन्सचा प्रवास थांबला; पांड्या म्हणाला, फक्त हा सामनाच नव्हे तर...

हार्दिकला 3 सामन्यात 3 वेळा दंड ठोठावला

पहिल्यांदा - पंजाब किंग्स विरुद्ध12 लाखांचा दंड

दुसऱ्यांदा - लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध 24 लाखांचा दंड

तिसऱ्यांदा - पुन्हा लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध 30 लाखांचा दंड

आयपीएलने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, स्लो ओव्हर रेटबाबत आयपीएलच्या आचारसंहितेनुसार या हंगामात मुंबई इंडियन्सची ही तिसरी चूक होती. या कारणामुळे हार्दिक पांड्यावर 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून त्याच्यावर पुढील सामन्यात खेळण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

आयपीएल 2024 मध्ये एका सामन्याच्या बंदीला सामोरे जाणारा हार्दिक पांड्या हा दुसरा कर्णधार आहे. यापूर्वी ऋषभ पंतवरही ही कारवाई करण्यात आली होती. स्लो ओव्हर रेटमुळे त्याच्यावर एका सामन्याची बंदीही घालण्यात आली होती आणि त्यामुळे तो आरसीबीविरुद्धच्या सामन्यात सहभागी होऊ शकला नाही.

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply