Hajj pilgrims : हज यात्रेकरूंना पायाभूत सोयीसुविधा देण्यासाठी ८ कोटींचा निधी : अब्दुल सत्तार

Hajj pilgrims : नागपूर शहरांमध्ये विशेषत: विदर्भामध्ये हजच्या यात्रेकरूसाठी सोयी सुविधा मिळणार आहेत. ज्या पद्धतीने संभाजीनगरमध्ये अद्यावत हज हाऊस बांधण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर नागपूरात हज हाऊसमध्ये सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार दिली. 

वर्षांपासून हजच्या यात्रेकरूसाठी पायाभूत आणि मूलभूत सुविधा द्यायच्या होत्या. यासाठी ८ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे ते म्हणाले. अल्पसंख्यांक विभाग बनले त्यावेळेस या विभागाला ३० कोटी दिले जात होते. आता त्याला ५०० कोटी रुपये दिले जाते. अल्पसंख्यांक विभाग बनल्यापासून त्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. कुठेच निधी कमी पडू दिला नसल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

International Women's Day : महिला नेतृत्व करत असलेली ‘ईपिरॉक कंपनी’

हज हाऊसला लागून महानगरपालिकेच्या मालकीची जागा हज हाऊस कमिटीला देण्यात आलीय. याच १८००० स्क्वेअर फुटाची मान्यता मिळवत या जागेचा सुशोभीकरण केलं जाणार असल्याची माहितीही सत्तार यांनी दिलीय. तसेच इमारतीला अत्याधुनिक पद्धतीने नवीन तंत्रज्ञाच्या सहाय्याचा उपयोग करून दुरुस्त केले जाईल. तसेच पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहे.

मुस्लिम समाजाच्या हज यात्रेसाठी लागणाऱ्या सोयी सुविधेच्या अनुषंगाने 40 खोल्या प्रसाधनगृह लिफ्ट यासह अनेक पायाभूत सोयी सुविधा उभारल्या जाणार आहेत. आज हजला जाण्यासाठी मोठ्या संख्यने मुस्लिम बांधव हे मध्यप्रदेश, छत्तीसगड, तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यातून येत असतात. त्यांना त्यांच्या अनुषंगाने सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाण्याचा हा प्रयत्न आहे.

काँग्रेसच्या काळात अनिस अहमद हे अल्पसंख्यांक मंत्री असताना सुद्धा यासाठी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला होता. तसेच आज हाऊसचे अध्यक्ष आसिफ भाई यांना राज्यमंत्र्याचा दर्जा देण्यात आलाय. पहिल्यांदा अशा पद्धतीचा काहीतरी घडलं असं सत्तार म्हणालेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply