Hailstone : राज्याला गारपिटीचा तडाखा! अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान

मुंबईः हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागांमध्ये आज वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. प्राथमिक माहितीनुसार राज्यातील नऊ जिल्ह्यांना गारपिटीची तडाखा बसला आहे. यामध्ये मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातदेखील वादळी वाऱ्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं.

द्राक्ष, डाळिंब, संत्रा, आंबा, केळी, काजू या पिकांना गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. बीड, उस्मानाबाद, सोलापूर, जालना, धुळे, नाशिक, नंदूरबार, परभणी जिल्ह्यामध्ये आज गारपिटीसह पाऊस झाला. महाराष्ट्रात १ जून ते ३० सप्टेंबर या काळात मॉन्सूनचा ८० ते ८५ टक्के पाऊस पडतो. उर्वरित १५ ते २० टक्के पाऊस ऑक्टोबर ते मे या काळात पडत असतो. त्यामुळे सध्याचा वादळी पाऊस असामान्य, अनपेक्षित असे काही नसून तो वर्षानुवर्षे हवामान प्रक्रियेचाच एक भाग असल्याचं तज्ज्ञांतं मत आहे.

विशेष म्हणजे यांस आपली भौगोलिक परिस्थितीच जबाबदार आहे. महाराष्ट्र भारतीय द्वीपकल्पाचा एक मोठा भाग आहे. या द्वीपकल्पाच्या पश्‍चिमेस अरबी समुद्र आणि पूर्वेकडे बंगालचा उपसागर आहे. मॉन्सून प्रक्रियेत या दोन्ही समुद्रांचे मोठे महत्त्व आहे. कधी कधी अन्य ऋतूंमध्येही अशी काही वातावरणीय परिस्थिती निर्माण होते, की या समुद्रावरचे वारे महाराष्ट्रावर बाष्प घेऊन येतात आणि ते उत्तरेकडून येणाऱ्या थंड-कोरड्या वाऱ्यांना भिडतात. त्यामुळे राज्यात पाऊस पडतो.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *