Hafiz Sayeed : दहशतवादी हाफिज सईदला आमच्याकडे सुपूर्द करा; भारताची पाकिस्तानकडे मागणी

Hafiz Sayeed : लष्कर-ए-तोयबाचा  प्रमुख आणि मुंबईत 26/11 ला झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला आमच्याकडे सुपूर्द करा, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केलीये. भारत सरकारने त्याला परत आणण्यासाठी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात येईल, असे म्हटलय. हाफिज सईद 2008 मध्ये झालेल्या 26/11 चा हल्ला आणि 2019 मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यातील प्रमुख आरोपी आहे. शिवाय, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला दहशतवादी घोषित करण्यात आलय. संयुक्त राष्ट्र संघटनेने हाफिज सईदचा आंतरराष्ट्रीय दहशतवादांच्या यादीत समावेश केलाय. दरम्यान सध्या तो पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. 

हाफिजला आजीवन कारावासाची शिक्षा? 

मागील वर्षी पाकिस्तानातील दहशतवाद विरोधी न्यायालयाने 32 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. यापूर्वी हाफिज 5 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 36 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान, या दोन्ही सुनावण्यात आलेल्या शिक्षा एकत्रित मोजण्यात येणार आहेत. त्यामुळे एकूण 36 वर्षांचा कारावास त्याला भोगावा लागणार आहे. शिवाय, हाफिज खरच पाकिस्तानातील तुरुगांत शिक्षा भोगतोय का? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. हाफिज सईदला पकडणाऱ्या 1 लाख डॉलरचे बक्षिस दिले जाईल, अशी घोषणा अमेरिकीने केली आहे. हाफिज हा जमाद उद दवाचा देखील प्रमुख आहे. दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी त्याला शिक्षा सुनावण्यात आली होती. 

Raj Thackeray And Eknath Shinde Meet : राज ठाकरे-एकनाथ शिंदे यांची पुन्हा भेट, राजकारणात नव्या युतीची नांदी?

'लष्कर ए तोयबा'चा म्होरक्या 

हाफिज सईद भारतातील झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामील होता. त्याच्यावर 2008 मधील मुंबईत झालेल्या हल्ल्याला जबाबदार मानले जाते. शिवाय तो दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाचा प्रमुख आहे. या संघटनेवर जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ले केल्याचे आरोप आहेत. लष्कर ए तोयबानेही आम्हीच हल्ले केल्याचे ठामपणे म्हटले आहे. लष्कर ए तोयबाचे पाकिस्तानमध्ये स्थित आहे. या संघटनकडून सर्व हल्ल्यांची तयारी पाकिस्तानातून केली जाते. पाकिस्तानातून अनेक दहशतवाद्यांना प्रशिक्षण देखील दिले जाते. प्रशिक्षित दहशतवाद्यांना भारतात हल्ले करण्यासाठी पाठवले जाते. 

हाफिज सईदचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात 

हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद हा पाकिस्तानमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. याबाबत हाफिज सईदचा पक्ष पाकिस्तान 'मरकजी मुस्लिम लीग'ने माहिती दिली आहे. पुढील वर्षांत होणाऱ्या निवडणुकांमध्ये तल्हा सईद निवडणुक लढवताना दिसणार आहे. 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply