Hadapsar News : साडेसतरानळी मतदान केंद्रावर मतदारांना कसरत करावा लागण्याचा धोका

 

Hadapsar News : नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे साडेसतरानळी येथील जिल्हा परिषद शाळा मतदान केंद्रासमोर मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे येथे मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना मोठी कसरत करावी लागणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबत गांभीर्याने घेऊन त्यावर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

मतदानाचा अधिकार निर्विघ्नपणे बजावता यावा, मतदानाचा टक्का वाढावा, मतदार राजाला सुलभपणे मतदान मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपाययोजना राबवून सुविधा दिल्या जात आहेत. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा म्हणून प्रबोधन केले जात आहे. असे असताना साडेसतरानळी येथील मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावरील मैदानावर साचलेल्या चिखलातून मतदारांना कसरत करावी लागणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Ahmednagar News : मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात

 

येथील जिल्हापरिषद शाळेत ११ मतदान केंद्रे आहेत. शनिवारी (ता.११) सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारा समोरील मैदानावर मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. आज येथे त्यातून मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला आहे. हवामान विभागाने आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार पाऊस झाल्यास मतदारांना येथील केंद्रात मतदानास जाताना कसरत करावी लागणार असल्याचा धोका निर्माण झाला आहे.

"येथील मैदानात थोड्या पावसातही चिखल होतो. मोठ्या पावसात पाणी साठवून राहते. निवडणूक आयोगाने पालिकेकडून तात्काळ उपायोजना करून घ्यावी, त्यामुळे मतदारांना सुलभपणे मतदानास जाता येईल.'

राहुल तुपे, मतदार

"मतदान केंद्रासमोरील पाण्याचा निचरा करून गाळाची साफ सफाई करण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांना सांगितले आहे. त्याचे काम सुरू आहे. मतदारांना येथून प्रवास करताना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply