Gunratna Sadavarte News : गुणरत्न सदावर्तेंना मोठा झटका, दोन वर्ष वकिली करता येणार नाही

Mumbai News : अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मोठा झटका बसला आहे. राज्य बार काऊन्सिल आणि ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी सदावर्ते यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. या कारवाईनंतर सदावर्ते यांना दोन वर्ष वकिली करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला चिथावणी दिल्याचा सदावर्ते यांच्यावर आरोप होता. तसेच काळा कोट परिधान केलेला असताना हातात पट्टी बांधणे हे वकिली पेश्याला साजेशे नाही.  

गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षण आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान मीडिया समोर चुकीची वक्तव्य केल्याचा दावा करत बार कौन्सिलकडे तक्रार करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने देखील सदावर्ते यांच्या विरोधातील शिस्तभंगाची कारवाई थांबवण्यास नकार दिला होता.

एसटी कर्मचारी संपादम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी बार काऊन्सिलने वकिलांना घालून दिलेली शिस्तीची नियमावली वारंवार मोडली होती. अशी तक्रार पिंपरी चिंचवड शहरातील ख्यातनाम वकील सुशील मंचरकर यांनी बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा कडेकेली होती.

एसटी कर्मचारी संपादरम्यान गुणरत्न सदावर्ते हे सार्वजनिक ठिकाणी वकिलांचा ड्रेस कोड घालून फिरत होते. सार्वजनिक ठिकाणी वकिलांनी वकिलांचा गाऊन घालून सहभागी होऊ नये. अशी वर्तवणूक नियमावली बार काऊन्सिलने देशातील सर्व वकिलांना घातली आहे. त्या वर्तवणूक नियमावलीचे उल्लंघन सदावर्ते यांनी वारंवार केल्यामुळे त्यांची सनद दोन वर्षासाठी रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती तक्रारदार अॅड. सुशील मंचरकर यांनी दिली आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply