Pandharpur News : शेतक-यांसाठी आनंदाची बातमी! शेतीसाठी उजनीतून पाणी साेडले

Pandharpur News : सोलापूर जिल्ह्यातील शेतक-यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उजनी धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. काल रात्रीपासून डाव्या कालव्यातून 500 क्युसेक पाणी सोडले गेले आहे.

सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सुरू असतानाच आता शेतीसाठी ही कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी 11 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे अशी माहिती प्रशासनाने दिली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत काल कालवा सल्लागार समिती बैठक झाली.

Gulabrao Patil : उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांसारखे भूत आवरावे

त्यामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेतीसाठी पाणी सोडण्याची सूचना केली होती. त्यानुसार रात्री पासून डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. यावर्षी पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे.

सध्या उजनी धरणात 5.34 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. या हंगामातील शेतीसाठी शेवटचे आवर्तन आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply