Gujarat News : एटीएसची मोठी कारवाई; अहमदाबाद विमानतळावर ISIS च्या ४ दहशतवाद्यांना अटक

Gujarat News : एटीएसने गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई करत इसिसच्या ४ संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. केंद्रीय एजन्सींनी दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे चौघांना अटक केल्याची माहिती आहे. ऐन निवडणुकीत केलेल्या या कारवाईनंतर एकच खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेले सर्वजण मूळचे श्रीलंकेचे रहिवाशी आहेत. हे दहशतवादी अहमदाबादला का आले होते, तिथे कोणाच्या संपर्कात होते का याचा तपास सध्या तपास यंत्रणांकडून सुरू आहे.

केंद्रीय एजन्सीकडून माहिती मिळाली होती. त्यानंतर एटीएसकडून विमानतळाची झडती घेण्यात आली आणि मूळचे श्रीलंकेचे नागरिक असलेल्या चार जणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या चौघांचा गुजरात किंवा अन्य राज्यात काही संबंध आहे का, याचा तपास करण्यात येत आहे.

Pune Car Accident : पुणे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; मुलाचे वडील आणि दारु देणाऱ्या २ पब चालकांविरोधात गुन्हा दाखल

केंद्रीय तपास यंत्रणा गेल्या काही दिवसांपासून अहमदाबात विमानतळावर सोन्याच्या तस्करीवर नजर ठेवून आहेत. त्यादरम्यान तपास यंत्रणांना काही इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित संशयित विमानतळावर येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे विमानतळावर गस्त वाढवण्यात आली होती.

केंद्रीय यंंत्रणाच्या माहितीच्या आधारे एटीएसचं पथक बराचा काळ लक्ष्य ठेवून होतं. अखेर विमानतळावर एक व्यक्ती संशयित आढळली. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने आणखी तिघांची नावं सांगितली. त्यानंतर सर्वांना ताब्यात घेतलं. चारही संशयित इसिस या दहशतवादी संघटनेशी बऱ्याच काळापासून संपर्कात असल्याचं तपास यंत्रणांनी सांगितलं

 
 
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply