
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज सौराष्ट्र-कच्छ प्रांत व दक्षिणेकडील १९ जिल्ह्यांतील ८९ मतदारसंघांत मतदानाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात ७८८ उमेदवार रिंगणात आहेत. मंगळवारी सायंकाळी पाचला या टप्प्यासाठीचा निवडणूक प्रचार थांबला होता. आज सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या आधीच राज्यभरामध्ये निवडणूक आयोगाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान २९० कोटी रुपयांची रोकड, मादक पदार्थ, दारुचा साठा आणि भेटवस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार २०१७ च्या विधानसबा निवडणुकीच्या तुलनेत यंदा जप्त करण्यात आलेली रक्कम ही १० टक्के अधिक आहे. वेगवेगळ्या यंत्रणांच्या मदतीने निवडणूक आयोगाने ही कारवाई केल्याचं म्हटलं आहे. दहशतवादी विरोधी पथक म्हणजेच गुजरात एटीएसच्या तुकडीच्या मदतीने वडोदरा (ग्रामीण) आणि वडोदरा (शहर) मतदारसंघामध्ये एक मोहिम चालवण्यात येत आहे. यामध्ये नशा करण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ प्रामुख्याने मेफेड्रोनची तस्करी केली जात असल्याची दोन प्रकरण उघडकीस आली आहेत. या छापेमारीमध्ये ४७८ कोटी किंमतीचं १४३ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आलं असून पाच जणांना अटक करण्यात आलीय.
निवडणूक आयोगाने ही मोहीम सुरुच राहणार असल्याचे संगाताना या तपासासंदर्भातील सविस्तर माहिती नंतर प्रसिद्ध केली जाईल असं म्हटलं आहे. २०१७ च्या निवडणुकीदरम्यान एकूण जप्त करण्यात आलेली रक्कम ही २७ कोटी २१ लाख इतकी होती. यंदा २९ नोव्हेंबरपर्यंत जप्त करण्यात आलेली रक्कम ही २९० कोटी २४ लाख इतकी आहे. ही मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत १०.६६ टक्के अधिक आहे.
गुजरात एटीएसच्या या मोहिमेदरम्यान प्रतिबंध असलेल्या औषधांबरोबरच ६१ कोटी ९६ लाखांचे अंमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत. १४ कोटी ८८ लाख किंमत असलेली चार लाख लिटर दारुही जप्त केल्याचं आयोगाने म्हटलं आहे. दारुबंदी असलेल्या राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात दारुचा साठा सापडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
भाजपा उमेदवाराविरुद्ध दारुसंदर्भातील विधानामुळे एफआयआर
निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच भाजपाच्या एका उमेदवाराने मद्याची खुलेआम विक्री करता येऊ शकते, असे कथित वक्तव्य केले. त्यामुळे या उमेदवाराविरोधात ‘एफआरआय’ दाखल करण्यात आला आहे. गुजरातमध्ये मादक पदार्थ तयार करणे, बाळगणे, विक्री आणि वापरास बंदी आहे. २६ नोव्हेंबर रोजी एका सभेची चित्रफित प्रसारीत झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी बनारसकांठा जिल्ह्यातील दांता मतदारसंघातील भाजप उमेदवार लाटूभाई पारघी यांच्याविरोधात तक्रार दाखल आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. मद्य खुलेआम विक्री करण्यास परवानगी देण्यात येईल, असे पारघी यांनी महिलांच्या एका गटासमोर कथित वक्तव्य केल्याचा आरोप आहे.
आकडेवारी काय सांगते?
२०१७ मधील निवडणुकीत भाजपने या टप्प्यात ८९ पैकी ४८ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने ४० जागा जिंकल्या होत्या व एक अपक्ष उमेदवार निवडून आला होता. या टप्प्यात सर्व ८९ जागांवर भाजप-काँग्रेसने उमेदवार उभे केले आहेत. तर ‘आप’ने ८८ उमेदवार उभे केले आहेत. बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व भारतीय ट्रायबल पार्टीसह (बीटीपी) इतर ३६ राजकीय पक्षांनी विविध जागांवर उमेदवार उभे केले आहेत. ३३९ अपक्ष रिंगणात आहेत. गुजरातमधील एकूण चार कोटी ९१ लाख ३५ हजार ४०० पैकी दोन कोटी ३९ लाख ७६ हजार ६७० मतदार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान करण्यास पात्र आहेत. एकूण १४,३८२ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, त्यापैकी तीन हजार ३११ केंद्र शहरी भागात व ११ हजार ०७१ केंद्र ग्रामीण भागात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

