Guillain-Barré Syndrome in Pune : पुण्यात गुईलेन सिंड्रोम आजाराची दहशत, २२ संशयित रूग्ण, लक्षणं काय?

Guillain-Barré Syndrome in Pune : एचएमपीवी हा आजार भारतात दाखल झाल्यानंतर पुण्यात एका नव्या आजारानं एन्ट्री केलीय. गुइलेन बॅरे सिंड्रोम असे नव्या विषाणूचे नाव असून, याचे २२ संशयित रूग्ण आढळल्याची माहिती समोर आलीय. या सर्व संशयित रूग्णांचे नमुने इंडियन मेडिकल काऊन्सिल ऑफ रिसर्च येथे तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. तपासणीअंती या आजाराचा निष्कर्ष निघणार आहे. मात्र, या नव्या आजारामुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

संशयित रूग्णांपैकी काही रूग्णांना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि पूना हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. तसेच सिंहरोड परिसरातही गुइलेन बॅरे सिंड्रोम या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरची काही प्रकरणं पुणे महापालिकडे नोंदवली आहेत. या दुर्मिळ आजारावर लक्ष ठेवण्यासाठी पुणे पालिकेतर्फे बाधित भागात टीम पाठवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे परिसरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुइलेन बॅरे सिंड्रोम हा आजार नेमका काय?

गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ आजार आहे. दरवर्षी १ लाख लोकांमधून एका व्यक्तीला हा आजार होतो. चेतासंस्थेच्या चाचण्या तसेच स्पायनल फ्लुइड चाचण्या याच्या निदानासाठी आवश्यक असतात. आयव्हीआयजी अथवा प्लाझ्मा एक्स्चेंजसारख्या उपचारांमुळे रुग्णाला लवकरात लवकर मदत मिळते. या आजाराचे बहुतांश रूग्णे बरे होतात. पण तरीही यातील २० टक्के रूग्णांना ६ महिन्यांनंतरही हालचालींमध्ये अडचणी येतात.

गुइलेन बॅरे सिंड्रोम आजाराची लक्षणे

गुइलेन बॅरे सिंड्रोम हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आणि ऑटोइम्यून आजार आहे. या आजारेचे पहिले लक्षण शक्तपणा आणि हातापायांना मुंग्या येणे आहे. या आजाराचे नेमकं कारण काय? हे अद्याप समोर आलेलं नाही. या दुर्मिळ आजाराची कारणे पूर्णपणे समजून घेणे हे आता वैद्यकीय शास्त्रासाठी एक आव्हानच आहे.

 


या आजाराबाबत माहिती देताना आरोग्य प्रमुख मीना बोराडे म्हणतात, 'रुग्ण उपचारासाठी पुण्यात आलेले होते. पुण्याच्या बाहेरील हे रुग्ण आहेत. हा आजार संसर्गजन्य नाही. या रुग्णांची तपासणी केली जात आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये रूग्ण उपचार घेत आहेत, त्या परिसरातही रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. पुणे शहरातील एकूण सहा रूग्ण आहेत'.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply