Gram Panchayat Result : जालना : रावसाहेब दानवेंच्‍या गावात भाजपचा दणदणीत विजय; तीस वर्षांपासूनची सत्‍ता कायम

जालना : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जवखेडा खुर्द गावात ३० वर्षानंतर निवडणूक झाली. या निवडणूकीत दानवेंचे वर्चस्व कायम ठेवण्यात त्यांच्या भावजाई सुमन मधुकर दानवे यांना यश आले. यामुळे तीस वर्षांपासून सत्‍ता कायम राहिली आहे.

जवखेडा खु. गावात लागलेल्‍या निवडणूकीमुळे मागील तीस वर्षानंतर गावात मतदान झाले. यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची प्रतिष्‍ठा पनाला लागली होती. त्‍यांच्‍या भावजाई सुमन दानवे यांनी राष्ट्रवादीच्या सुनिता संतोष दानवे यांचा दणाणून पराभव करत पुन्हा एकदा ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकवत 30 वर्षाची परंपरा कायम ठेवत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिष्ठा कायम ठेवली आहे.

रावसाहेब दानवे यांनी याच ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदी निवडून येऊन आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरवात केली होती. गेली 30 वर्ष दानवे कुटूंबाचे वर्चस्व या ठिकाणी कायम असताना 7 सदस्य असणाऱ्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 5 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. परंतु, राष्ट्रवादीकडून सरपंच पदाच्या उमेदवारास 2 उमेदवार रिंगणात उतरविल्याने जवखेडा खुर्द गावात भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगला. मात्र आज पुन्हा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या भावजाई सुमन मधुकर दानवे यांना राष्ट्रवादीच्या सुनिता संतोष दानवे यांच्‍यावर दणदणीत विजय मिळविला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply