Gram Panchayat Election Results : बारामतीत अजित पवार गटाचे वर्चस्व तर रोहित पवारांचे गंभीर आरोप म्हणाले, 'स्वतःची पाठ थोपटून...पैसे...'

Gram Panchayat Election Results : राज्यभरात काल(रविवारी) ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. पुणे जिल्हयातील २३१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका तर १५७ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीचे निकाल आज समोर येत आहेत. बारामती तालुक्यात अजित पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत झाल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. काटेवाडीत ग्रामपंचायतीच्या सर्व १६ जागांसाठी मतदान पार पडलं. काटेवाडी गावात गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. तर आज आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार १३ जागांवर अजित पवार गटाचे वर्चस्व दिसून येत आहे.

तर याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) आणि आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, 'आता सुरुवात झालीय, पुढे पाहावं लागेल कशा पद्धतीने निकाल लागतील. स्वतःची पाठ थोपटून घेतात हे योग्य नाही. पैशाचा वापर ग्रामपंचायतीमध्ये केला गेला, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

Grampanchayat : अमोल कोल्हेंच्या नारायणगावमध्ये राष्ट्रवादीचा दारुण पराभव; राज्यात कुणाकडे किती ग्रामपंचायती?

तर आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार बारामतीमध्ये आमबी बुद्रुक, भोंडवे वाडी, पवई माळ, महसोबा नगर, पानसरे वाडी, गाडी खेल, जराडवाडी, करंजे, कुतवल वाडी,सिद्धेश्वर निंबोडी, दंडवाडी, मगर वाडी, साबळे वाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विजयी झाला आहे.

अजित पवार गटाने निवडणुकीत पैसे वाटले; भाजपचा आरोप

भाजपचे पॅनल प्रमुख पांडुरंग कचरे यांनी अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. ही निवडणूक गावकऱ्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी आहे. गावातील भ्रष्टाचार आणि दहशत आपल्याला कमी करायची आहे. गावात काहीच व्यवस्था नाहीत. नाव मोठं आणि लक्षण खोटं, अशी परिस्थीती गावात आहे, असे कचरे म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply