Gram Panchayat Election Result 2022 : लातूर : कॉंग्रेसच्या लाला पटेल यांची विजयाची हॅट्रिक; दापका ग्रामपंचायत जिंकल्यानंतर JCBतून जंगी मिरवणूक

Gram Panchayat Election Result 2022 : राज्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत मतदार राजा कुणाच्या हाती सत्ता देणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यादरम्यान अनेक ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. जिंकल्यानंतर निवडूण आलेले सदस्य आपापल्या पद्धतीने विजयोत्सव साजरा करतायत. अशात लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात एका विजयी उमेदवाराची चक्क जेसीबीवर बसवून मिरवणुक काढण्यात आली. आहे. 

लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील दापका ग्रामपंचायतीवर तिसऱ्यांदा काँग्रेसचे लाला पटेल यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. एकुण १७ जागांपैकी १३ जागा निवडून आल्यानंतर कार्यकर्त्यांनी थेट जेसीबीमध्ये बसून विजयोत्सव साजरा करत मिरवणूक काढली आहे. ही जंगी मिरवणूक आणि जेसीबीमध्ये बसल्याचे फोटोज सध्या व्हायरल होत आहे.

निलंगा तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी सकाळी दहा वाजता येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मतमोजणीला सुरवात झाली, ग्रामपंचायत निवडणूकीचा मोठा टप्पा असल्याने गर्दी होती.  

लाला पटेल यांनी विजयाची हॕट्रीक साधत पुन्हा एकदा सत्ता काँग्रेसकडे खेचून आणत तिसऱ्यांदा सत्ता कायम ठेवली. तर गेल्या अनेक वर्षापासून कायम काँग्रेसकडे राहीलेल्या मुगाव ग्रामपंचायत भाजपाकडे गेली आहे. जिल्हापरिषद व पंचायत समितीची सत्ता सुरेंद्र धुमाळ यांच्याकडे ळ अनेक वर्षापासून ग्रामपंचायत ताब्यात होती काँग्रेस पक्षाला सतत या गावातून हजारो मताची लिड असायची मात्र यावेळी गावातील तरूणांनी काँग्रेसची सत्तेला सुरूंग लावला आहे. तर निटूर ग्रामपंचायतीवर भाजपा विजयी झाले आहे. तेथील सरपंच परमेश्वर हासबे यांच्या पॕनलचा पराभव झाला आहे. एकंदरीत झालेल्या मतमोजणीत भाजपाचा बोलबाला अधिक झाला आहे.

अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदुर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751.

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावागावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी हजारो पोलिस कर्मचारी गावागावामध्ये तैनात असतील. तर संवेदनशील असलेल्या गावांमध्ये अधिकचा फौजफाटा देण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply