Gram Panchayat Election : तळेगाव ढमढेरे : करंजावणे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी मंगल संतोष दौंडकर प्रचंड मतांनी विजयी

तळेगाव ढमढेरे : करंजावणे (ता. शिरूर) ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत मंगल संतोष दौंडकर यांचा प्रचंड मतांनी विजय झाला असून,आरती शांतीदेव शिंदे यांचा दारुण पराभव झाला आहे. करंजावणे गावात सरपंचपदासह तीन प्रभागात सदस्यपदासाठी चुरशीने मतदान झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.बी. जगताप यांनी काम पाहिले. सरपंचपदासाठी पाच उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी माजी सरपंच संतोष दौंडकर यांच्या पत्नी मंगल दौंडकर यांछा ७३९ मते मिळून विजय झाला तर माजी सरपंच शांतीदेव शिंदे यांच्या पत्नी आरती शिंदे यांचा ३९५ मते मिळाल्याने मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. सरपंचपदाच्या निवडणुकीत मंगल संतोष दौंडकर या प्रचंड मताने विजयी झाल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

विजयानंतर नवर्निर्वाचित सरपंच मंगल दौंडकर यांनी रांजणगाव गणपती येथील अष्टविनायक महागणपतीचे दर्शन घेतले. तेथे त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर करंजावणे गावातून सरपंचासह नूतन सदस्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गुलालाची उधळण व फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. निवडीनंतर ग्रामस्थांतर्फे सरपंच मंगल दौंडकर व सदस्यांचा ठीक ठिकाणी सत्कार करण्यात आला.

प्रभाग व आरक्षणानुसार विजयी सदस्य व मते :-

प्रभाग क्रमांक - १ (सर्वसाधारण) १ जागा :- रंगनाथ शहाजी शिंदे (२९३ मते).

सर्वसाधारण स्त्री राखीव- २ जागा :- सुजाता प्रकाश काळकुटे २०३) व सुभद्रा निळकंठ माकर (२५१).

प्रभाग क्रमांक-२ -नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव १ जागा :- स्वाती कैलास कुदळे (२७०).

सर्वसाधारण स्त्री राखीव जागा :- मोहिनी किरण दौंडकर (२६८).

सर्वसाधारण जागा १ :- श्रीराम संपत शेलार ( बिनविरोध).

प्रभाग क्रमांक ३- सर्वसाधारण स्त्री राखीव जागा १:- अनुसया नामदेव इंगळे (२२१).

सर्वसाधारण जागा १ - राजू खंडू पुणेकर ( बिनविरोध).

नागरिकांचा मागास प्रवर्ग जागा १: बिरा चंदर कुलाळ (बिनविरोध).



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply