Government Employees : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, सुधारित पेन्शन योजना १ मार्चपासून लागू होणार

Government Employees : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील सरकारी कर्चमाऱ्यांना १ मार्चापासून सुधारित पेन्शन योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होईल, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी दिली. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या प्रतिनिधी आणि राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांची सोमवारी मंत्रालयामध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये नितीन करीर यांनी ही माहिती दिली. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय देखील घेण्यात आले. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आनंद झाला आहे. कारण सरकारच्या या निर्णयाचा फायदा राज्यातील जवळपास ८ लाखांपेक्षा जास्त सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे.

राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी या बैठकीमध्ये सांगितले की, केंद्राप्रमाणे ४ टक्के महागाई भत्ता त्वरित मंजूर करण्यात येणार आहे, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्री पातळीवर सादर करण्यात आला आहे. या बैठकीमध्ये नितीन करीर यांनी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या प्रतिनिधींना आश्वासन दिले की, 'सुधारित पेन्शन योजना १ मार्च २०२४ पासून लागू होईल. त्याचे शासन आदेश देखील जारी होतील.'

Pune Water Supply : पुणेकरांवर पाणीसंकट! खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने घटला; आता किती टक्के पाणी शिल्लक?

महत्वाचे म्हणजे, २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या जवळपास साडेआठ लाख कर्मचाऱ्यांना सरकारच्या सुधारित पेन्शन योजना निर्णयाचा फायदा होणार आहे, अशी माहिती राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी दिली. त्यामुळे राज्यातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या सुधारित पेन्शनच्या संदर्भात लवकरच अधिसूचना जारी केली जाण्याची चिन्हे आहेत. येत्या पावसाळी अधिवेशात पेन्शनचा प्रश्न मार्गी लागण्याचे संकेत आहेत.

राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी या बैठकीमध्ये सांगितले की, केंद्राप्रमाणे ४ टक्के महागाई भत्ता त्वरित मंजूर करण्यात येणार आहे, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्री पातळीवर सादर करण्यात आला आहे. या बैठकीमध्ये नितीन करीर यांनी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या प्रतिनिधींना आश्वासन दिले की, 'सुधारित पेन्शन योजना १ मार्च २०२४ पासून लागू होईल. त्याचे शासन आदेश देखील जारी होतील.'

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply