Gor Sena Morcha : गोर सेनेचा पहूरमध्ये माेर्चा, आंदाेलकांनी फाेडल्या वाहनांच्या काचा; पाेलिसांनी कुमक वाढवली

Gor Sena Morcha : विमुक्त जाती (अ) प्रवर्गातील अवैध घुसखोरी थांबवण्याच्या मागणीसाठी आज (मंगळवार) गोर सेना व बंजारा समाज बांधव जळगाव जिल्ह्यात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. जामनेर तालुक्यातील पहूर गावात गोर सेनेच्यावतीने मागण्यांच्या पूर्ततेसाठी मोर्चा काढला. यावेळी माेर्चेक-यांनी जळगाव छत्रपती संभाजीनगर व भुसावळकडे जाणाऱ्या महामार्गावर रास्ता राेकाे आंदाेलन केले. काहींनी वाहनांचे नुकसान देखील केले. 

पहुर येथे गोर सेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या माेर्चामध्ये माेठ्या संख्येने बंजारा समाजातील लहानांपासून ज्येष्ठापर्यंत सहभागी झाले हाेते. घाेषणाबाजी करीत मोर्चेकरी पुढे पुढे सरकत हाेते.

Chandrakant Patil : टाळी एका हाताने वाजत नाही; भाजप आमदार गोळीबार प्रकरणी चंद्रकांत पाटीलांचं मोठं वक्तव्य

या आंदोलनाला काहीसे हिंसक वळण देखील लागल्याचे पाहायला मिळाले. संतप्त झालेले काही आंदोलकांनी भाजपाचे चिन्ह असलेल्या गाड्यांचा काचा फोडल्या. यामुळे आंदोलन स्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आंदोलकांनी तब्बल अडीच ते तीन तास महामार्ग रोखून धरल्याने छत्रपती संभाजीनगर जळगाव व बऱ्हाणपूरकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान आंदाेलकांची भूमिका लक्षात घेता जादा पाेलिस बंदाेबस्त घटनास्थळी मागविण्यात आला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply