Gondia Heavy Rain : २४ तासांत गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस; पांगोली नदीने गाठली धोक्याची पातळी

गोंदीया : गेल्या २४ तासांत गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. गोंदियाशहराच्या जवळून वाहणाऱ्या पांगोली नदीच्या पाणीपत्रात देखील वाढ झाली आहे. या नदीवर असलेला पर्यायी पुलावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे. 

गोंदीया जिल्‍ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे. पांगोली नदीने धोक्‍याची पातळी गाठली आहे. नदीवर बारब्रिक्स कंपनीच्यावतीने पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे पर्यायी पूल तयार करण्यात आला आहे. मात्र हा पर्यायी पूल कमी उंचीचा असल्याने कुठल्याही क्षणी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून या मार्गावरून होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. विशेष म्हणजे यावर्षी दुसऱ्यांदा हा पूल बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

MLA Disqualification Case : 16 आमदारांच्या निलंबनाबाबत विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; दिली 'इतक्या' दिवसांची मुदत

पुजारीटोला धरणाचे ८ दरवाजे उघडले

गोंदिया जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून मुसळधार पावसाला सुरवात झालेली आहे. पावसाचा जोर आताही कायम आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असून गोंदिया जिल्ह्यातील धरण साठ्यामध्ये वाढ झाली आहे. त्यापैकी पुजारीटोला धरण हा रात्रीच्या पावसाने भरला असून या धरणाचे ८ वक्रद्वार (गेट) १ फूट उंचीने उघडण्यात आले आहेत. त्यातून पाण्याच्या विसर्ग सुरू असून पाऊस थांबल्यानंतर धरण साठ्यामध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाल्यास वक्रद्वार (गेट) पुन्हा उघडण्यात येतील. त्यामुळे बाग नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या इशारा प्रशासनाद्वारे देण्यात आलेला आहे.

गोसीखुर्द धरणाचे २३ दरवाजे उघडले

भंडारा जिल्ह्यातील गोसे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस येत असल्यामुळे आज भंडाऱ्याचं गोसीखुर्द धरणाचे २३ दरवाजे उघडण्यात आलेत. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्‍या आहेत. गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असून २३ दरवाजांमधून ९५ हजार २९५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. मात्र, पावसाचा वाढता जोर पाहता आणखी चार दरवाजे उघडण्यात येणार असल्याची माहीती आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply