Gondia Crime : सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला आठ हजारांची लाच घेताना पकडले, गाेंदियामधील तिसरी माेठी कारवाई

Gondia Crime : गोंदिया शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अनिल पारधी यास 8 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. विशेष म्हणजे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची महिन्याभरातील ही तिसरी मोठी कारवाई आहे.

गाेंदिया जिल्ह्यात 7 मे 2024 ला गोरेगाव तहसीलदार, नायब तहसीलदार व एका खाजगी इसमाला लाच घेताना पकडण्यात आले होते. त्यानंतर 14 मे 2024 ला गोंदियाच्या सडक अर्जुनी येथील नगरपंचायतीमध्ये नगरपंचायत मुख्याधिकारीसह नगराध्यक्ष व नगरसेवक अशा 6 लोकांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते.

Maharashtra Politics : शरद पवार गटाला धक्का! युवा शिलेदार धीरज शर्मांचा अजित पवार गटात प्रवेश, सोनिया दुहानही उपस्थित

तक्रारदार यांच्यावर गोंदिया शहर पोलिसांत गुन्हा दाखल असून तक्रारदार आणि गैरअर्जदार यांच्यात समझाेता करून दिल्याचा मोबदल्यात 10 हजार रुपयाची लाच मागितली होती असा आराेप अनिल पारधी यांच्यावर हाेता. तडजोडी अंती 8 हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पारधी यास रंगेहात पकडल्याची माहिती एसीबीच्या अधिकारी यांनी दिली. गोंदिया शहर पोलिस ठाणे येथे अनिल पारधी याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 
 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply