Gold Smuggling : मुंबई विमानतळावर गुदद्वार, अंतर्वस्त्रातून सोने तस्करी; कस्टम विभागाकडून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

Gold Smuggling : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन जप्तीचं सत्र सुरुच असल्याचे दिसून येत आहे. विमानतळावर सोने तस्करी करणाऱ्यांच्या कस्टम विभागाने मुसक्या आवळत कट उधळला. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर १२.७४ किलो सोने जप्त केले. तस्करांकडून गुदद्वार,अंतर्वस्त्र, पाण्याच्या बाटलीतून तस्करी केली जात होती.  

मुंबई कस्टम विभागाकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने जप्ती सुरूच आहे. मुंबईतील कस्टम विभागाने तस्करांकडून जप्त केलेल्या सोन्याची किंमत ८.१७ कोटी रुपये आहे. यासहित विभागाने २० लाखांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली. कस्टम विभागाने वेगवेगळ्या २० प्रकरणातून ही कारवाई केली आहे.

Rohit Pawar : रोहित पवारांना बालेकिल्ल्यात धक्का! कट्टर समर्थकाने सोडली साथ; अजित पवार गटात प्रवेश

कस्टम विभागाने कारवाई केल्यानंतर पाण्याच्या बाटलीत, सोन्याची भुकटी स्वरुपात देखील तस्करी सुरु होती. तसेच विमानातील सीट खाली असलेल्या पाईपमध्ये देखील सोने लपवण्यात आल्याचं उघड झालं. या सर्व प्रकरणात विमानतळाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यासह ५ प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.

अफगाणिस्तानी महिलेकडून सोने तस्करी

मुंबई विमानतळावर डीआरआयने सोने तस्करी करणाऱ्या अफगाणिस्तानी महिलेला ताब्यात घेतलं. या महिलेकडून २५ किलो किमतीचं सोने जप्त केलं. या सोन्याची किंमत १८.६ कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ही महिला दुबईहून मुंबईला पोहोचली होती. त्यानंतर या महिलेकडून २५ किलो सोने जप्त केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply