Gokhale Bridge : मुंबईकरांना खुशखबर, अंधेरीचा गोखले पूल झाला खुला, वाहतूककोंडी फुटणार

Mumbai Andheri Gokhale Bridge Open : मुंबईतील गोखले पूल मुंबईकरांसाठी रविवारी खुला झाला. या पुलाच्या दुसऱ्या भागाचे उद्घाटन रविवारी संध्याकाळी आशिष शेलार यांच्या हस्ते आणि अंधेरी (पश्चिम) आमदार अमित साटम यांच्या उपस्थितीत झाले. बीएमसीच्या सर्वात जलद पूर्ण झालेल्या प्रकल्पांपैकी एक असलेला हा पूल २८ महिन्यांत कार्यान्वित झाला. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी पुलाचा पहिला भाग खुला झाला आणि आता दुसरा भाग पूर्ण झाला आहे.

अलिकडच्या काळात बीएमसीने सर्वात जलद गतीने पूर्ण केलेल्या प्रकल्पांपैकी एक म्हणून गोखले ब्रिजचे वर्णन केले. गोखले पूल बंद झाल्यानंतर १५ महिन्यांच्या आत एक बाजू कार्यान्वित करण्यात आली आणि २८ महिन्यांच्या आत पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आली. हा एक असाधारण अभियांत्रिकी पराक्रम आहे. कारण एका सक्रिय रेल्वे मार्गावर बांधकामाचा समावेश होता. हा बीएमसचा सर्वात जलद पूर्ण झालेल्या प्रकल्पांपैकी एक आहे, असे आमदार साटम म्हणाले.

Pune : भयावह! भरचौकात १८ वर्षाच्या तरूणीची हत्या, दुचाकीवर आले अन् सपासप वार केले

२०१८ मध्ये काम सुरू झाले, परंतु मार्च २०२० मध्येच कामाचे आदेश जारी झाले आणि प्रत्यक्ष बांधकाम नोव्हेंबर २०२१ मध्ये सुरू झाले. रेल्वे मार्गावरील बांधकामाची जबाबदारी कोणाची, याबाबत स्पष्टता नसल्यानेही विलंब झाला. नोव्हेंबर २०२२ मध्ये साटम यांनी प्रकल्पस्थळाला भेट देऊन आढावा घेतला. स्ट्रक्चरल ऑडिट अहवालात पूल जीर्ण झाल्याचे आणि गंजलेल्या स्टीलमुळे कोसळण्याच्या धोक्यात असल्याचे समोर आले. त्यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केला, ज्यांनी पूल बंद करण्याचे आदेश दिले. जानेवारी २०२३ मध्ये जुना पूल पाडण्यास सुरुवात झाली, तर मार्च २०२३ मध्ये नवीन बांधकाम सुरू झाले.

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply