Goa paragliding accident : गोव्यात पॅराग्लायडिंग करताना मोठा अपघात, पुण्यातील तरूणीसह पायलटचा मृत्यू

 

Goa paragliding accident : गोव्यात पॅराग्लायडिंग करताना दरीत पडून पुण्यातील तरूणी आणि पायलटचा मृत्यू झालाय. ही धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. केरी येथील डोंगराळ भागात झालेल्या अपघातात पुण्यातील शिवानी दाभाळे (वय वर्ष २७) आणि पायलट सुमल नेपाळी (वय वर्ष २६) यांचा दुर्देवी मृत्यू झालाय. या घटनेनंतर कंपनीचे मालक शेखर रायजादा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पुण्याहून गोव्याला गेलेल्या एका ग्रुपमधील तरूणीचा पॅराग्लायडिंग करताना दरीत कोसळून मृत्यू झाला आहे. गोव्याला फिरण्यासाठी पुण्याहून एक पर्यटकांचा ग्रुप केला होता. शनिवारी ५ च्या सुमारास हा ग्रुप पॅराग्लायडिंग करण्यासाठी गेला होता. ज्या ठिकाणीहून डोंगराळ भागात पॅराग्लायडिंग केली जाते, तेथे ग्रुप पोहोचला.

Kolkata : कोलकातामधील 'निर्भया'ला १६१ दिवसांनी मिळाला न्याय; आरोपी संजय रॉय दोषी, कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

यावेळी शिवानी दाभाळे हिने पायलटल सुमनसोबत उड्डाण केले. उड्डाण केल्यानंतर ग्लायडरची दोरी तुटली. दोरी तुटल्याने पॅराग्लायडर दरीत कोसळ्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. काही वेळातच पॅराग्लायडर दरीत कोसळला. ज्यात शिवानी दाभाळे आणि पायलट सुमन नेपाळी या दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

या प्रकरणी कंपनीचे मालक शेखर रायजादा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांद्रे पोलिसांनी कारवाई करत त्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. गुन्हा दाखल केल्यानंतर शिवानी दाभाळे हिने ज्या साहसी क्रिडा कंपनीकडून पॅराग्लायडिंगसाठी बुकिंग केले होते, ती कंपनी बेकायदेशीर असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी कंपनीचे मालक याची लवकरच चौकशी करून अटक करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply