Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं

Ghatkoper Crime : मुलगी नको म्हणून एका नराधम बापानं आपल्या चार महिन्याच्या मुलीची गळा दाबून हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना घाटकोपर पूर्वमध्ये घडली आहे. आरोपी आपल्या पत्नी आणि मुलांसोबत राहतो. त्याला तिसरे अपत्य मुलगी झाली म्हणून तो चिडला. या कारणामुळे तो पत्नीसोबत वारंवार भांडण करत होता. राग अनावर झाल्यामुळे त्यानं थेट पाळण्याच्या दोरीने गळा आवळून हत्या केली आहे. आरोपी बापाला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घाटकोपर पूर्वेतील कामराज नगरमध्ये घडली आहे. मुलगी नको म्हणून एका नराधम बापानं मुलीची गळा आवळून हत्या केली आहे. चिमुकली ४ महिन्यांची असल्याची माहिती समोर आली आहे. संजय बाबू कोकरे असे आरोपी बापाचे नाव आहे.

Pune : बलात्कार नाही, व्यवहार होता? दत्ता गाडेच्या वकिलांचा दावा

संजय बाबू कोकरे आपल्या पत्नी आणि २ मुलांसोबत राहतो. त्याला तिसरी मुलगी झाल्यानं तो चिडला होता. या कारणावरून दोघांमध्ये भांडणं होत असे. या गोष्टीचा राग त्याच्या मनात होता. पत्नी काही कामानिमित्त घराबाहेर गेली होती. यावेळी नराधम बापानं त्या चार महिन्याच्या मुलीची हत्या केली. त्यानं पाळण्याच्या दोरीनं चिमुकलीचा गळा आवळला.

गळा आवळल्यामुळे चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पंतनगर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंतनगर पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply