Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांची मोठी खेळी, अपक्ष शिक्षक उमेदवार ज्ञानदेव हांडे यांचा शिक्षक सेनेत प्रवेश

Ghatkopar : मुंबई शिक्षक मतदार संघाचे अपक्ष उमेदवार तथा महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.

सोबत राज्य सचिव भानुदास शिंदे, मुंबई प्रदेशाध्यक्ष मनोहर कदम, महिला अध्यक्षा अरुणा म्हात्रे, मुंबई सचिव दत्तात्रय शेडकर, मुंबई मनपा अध्यक्ष विनोद यादव, ठाणे जिल्हा अध्यक्ष सुदाम भोजणे, प्रसिद्धी प्रमुख तथा सहसचिव अनिल चिकणे, कार्याध्यक्ष सुरेश जाधव, यादव शेळके यांसह शेकडो शिक्षक पदाधिकाऱ्याऱ्यांसोबत शिक्षक सेनेत जाहीर प्रवेश केला.

Pune News : पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ; पोलिसांच्या गाडीसह 15 ते 20 वाहनांची तोडफोड, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण


शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार शिवाजी अज्ञान शेंडगे यांना प्रथम पसंतीचे मत देण्याचे आवाहन करत भरघोस मतांनी निवडून आणण्याचा विश्वास व्यक्त केला. या प्रवेशासाठी नगरसेवक किरण लांडगे, सचिन दादा जोशी, संजय मोरे, शितल म्हात्रे यांनी विशेष सहयोग केला.

2005 पूर्वी नियुक्त कर्मचान्यांची जुनी पेन्शन, अनुदान, सरसकट निवड श्रेणी, अतिरिक्त शिक्षक, कॅशलेस मेडिक्लेम , शिक्षण सेवक, खाजगी इंग्रजी शाळातील शिक्षकांचे किमान वेतन, सेवा संरक्षण असे अनेक निर्णय तातडीने घेण्याचे आश्वासने मुख्यमंत्री यांनी दिले. याप्रसंगी माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, आमदार मंगेश कुडाळकर, यासह आमदार, माजी आमदार, माजी नगरसेवक, शिवसेना नेते, उपनेते यासह शिवसेनेचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply