Ghati Hospital : घाटी रुग्णालयाचे प्रशासन हादरलं, रेबीजच्या इंजेक्शनमुळे अनेकांना रिएक्शन; अधिष्ठातांच्या तत्परतेने धोका टळला

Ghati Hospital : छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात रेबीजचे इंजेक्शन दिल्यानंतर अनेक रुग्णांना रिएक्शन झाल्याचे प्रकार समोर आला. या प्रकारामुळे घाटी प्रशासन आता चांगलंच हादरले आहे. दरम्यान अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी तातडीने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत इंजेक्शनचा स्टॉक सिल केला. नवीन बॅचचे इंजेक्शन वापरण्याच्या सक्त सूचना संबंधित विभागाला केल्या. 

गेल्या काही महिन्यांपासून शहरांमध्ये मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ हा गल्लोगल्ली आणि रस्त्यावर वाढल्याचं चित्र दिसत आहे. यामुळे भल्या भल्यांना थरकाप सुटत आहे. काही कुत्रे अंगावर येऊन लचके तोडण्याच्या ही घटना या नेहमीच्याच झाल्याने घाटी रुग्णालयात कुत्रे चावलेल्या रुग्णांची गर्दी आता वाढत आहे.

Lok Sabha Election : धाराशिवमध्ये भाजपला मोठा धक्का; निवडणुकीआधीच ठाकरे गटाचा बडा नेता स्वगृही परतणार

दरम्यान मागील 4 दिवसापासून घाटी रुग्णालयात अरेबिकचे इंजेक्शन दिल्यानंतर रुग्णांना रिएक्शन येण्याचे प्रमाण अचानक वाढल्याने त्यांना पुन्हा बरे होण्यासाठी पुन्हा 2 हजार 300 रुपयांचे इंजेक्शन बाहेरून खरेदी करून घ्यावे लागत असल्याने मनस्ताप व्यक्त होत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply