Ganpati Visrjan Pune : ९ हजार कर्मचारी तैनात, सीसीटीव्ही, ड्रोनद्वारे ठेवणार लक्ष... बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलीस सज्ज!

Ganpati Visrjan Pune :  गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेला गणेशोत्सवाचा जल्लोष आता अखेरच्या टप्प्यावर आला आहे. गुरूवार (२८, सप्टेंबर) ला गणपतीचे विसर्जन होणार आहे. दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी पुण्यातील गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली असून पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळणार आहे. गर्दीचा उच्चांक मोडणाऱ्या या विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलीस दलानेही मोठा बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन केले असून पोलीस दलही विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज झाले आहे.

Pune Fire News : गणपतीच्या आरतीत विघ्न, मंडपाला लागली आग; पुण्यातील धक्कादायक घटना

कसा असेल बंदोबस्त...

गणेश विसर्जन मिरवणुक काळात शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सोनसाखळी चोरी आणि महिलांची छेडछाड रोखण्यासाठी पोलिस पथके, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी ४० पोलिस मदत केंद्र तसेच संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मिरवणूक मार्गांवर २०५ सीसीटीव्हींची नजर असणार आहे.

शहरात विसर्जन मिरवणूक काळात 6 हजार 827 पोलीस कर्मचारी, 950 होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या २ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच या बंदोबस्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी १ पोलीस आयुक्त, १ सहाय्यक पोलीस आयुक्त, १० पोलीस उपायुक्त, 155 पोलिस निरीक्षक तसेच 578 सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply